- हिंदूंनो, अशी स्थिती उद्या देशाच्या कानाकोपर्यांत निर्माण होऊ नये, यासाठी संघटित व्हा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
- हिंदूबहुल भागांत धर्मांधांना घर नाकारल्यावर आकांततांडव करणारे पुरो(अधो)गामी, साम्यवादी, समाजवादी, डावे, कलावंत, खेळाडू, तथाकथित विचारवंत आणि प्रसारमाध्यमे हिंदूंच्या या स्थितीविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
नवी देहली : येथील बाबरपूर विधानसभा मतदारसंघातील मोहनपुरी, मौजपूर आणि नूर-ए-इलाही या भागांत रहाणार्या हिंदूंनी स्वतःच्या घरांवर ‘विशिष्ट धर्मियांच्या दहशतीमुळे हे घर विकणे आहे’, असा फलक लावल्याचे निदर्शनास आले आहे. ‘ओपीइंडिया’ या संकेतस्थळाने हे वृत्त प्रसारित केले आहे. देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारमधील मंत्री गोपाल राय यांचा हा मतदारसंघ आहे. काही मासांपूर्वी येथे भीषण दंगल झाली होती. या वृत्तानुसार, ‘विशिष्ट समाजातील लोकांच्या धमक्यांमुळे हिंदू कुटुंबे त्रस्त आहेत. या लोकांनी रात्री हिंदूंच्या घरांची दारे वाजवतात, तसेच धमक्याही देतात, अशीही हिंदूंची तक्रार आहे.’
आप सरकार हिंदूंशी भेदभाव करत आहे ! – भाजप
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर-पूर्व देहली लोकसभा मतदारसंघाचे खासदार मनोज तिवारी यांनी याविषयी ट्वीट करून माहिती दिली, तसेच त्यांनी ३१ जुलै या दिवशी वरील भागांचा दौराही केला. त्यानंतर तिवारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले.
या पत्रात म्हटले आहे की, ‘सरकार हिंदूंशी भेदभाव करत आहे. या भागांत काही ठिकाणी सुरक्षेसाठी लोकांना स्वखर्चाने गेट बसवावे लागले आहेत. याउलट पलीकडच्या भागांमध्ये सरकारी खर्चातून गेट बसवण्यात आले आहेत. या भागात एका विशेष समाजाचा प्रभाव आहे. येथील हिंसाचारानंतर देहली सरकार एकाच समाजाला कायदेशीर साहाय्य करत आहे. हिंसाचाराची झळ सर्वांनाच बसली असतांना साहाय्य करण्यात सरकार भेदभाव का करत आह ? या भागांत शांतता आणि सौहार्द टिकून ठेवण्यासाठी संघटितपणे काम केले पाहिजे.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात