अयोध्येतील राममंदिराच्या भूमीपूजनानिमित्त हिंदू आनंदोत्सव साजरा करणार
कुठल्याही देशातील डावे हे नेहमी चांगल्या कामात, विशेषतः हिंदूंच्या संदर्भात केवळ विघ्न आणण्याचेच काम करतात. हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणार्या अशा हिंदुद्वेष्ट्यांविरुद्ध त्या-त्या ठिकाणच्या हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवला पाहिजे आणि संबंधित सरकारांना त्यांच्याविरुद्ध कारवाई करायला भाग पाडले पाहिजे !
न्यूयॉर्क : अयोध्येतील राममंदिराच्या ५ ऑगस्ट या दिवशी होणार्या भव्य भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने न्यूयॉर्कमधील जगप्रसिद्ध ‘टाइम्स स्क्वेअर’ येथे हिंदूंकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून येथे तात्पुरते भगवान श्रीरामाचे भव्य ‘थ्री डी’ चित्र लावण्याची हिंदूंची योजना आहे.
तथापि यास अमेरिकेतील कट्टर डाव्या विचारसरणीची संघटना असलेल्या ‘दक्षिण आशिया सॉलिडिरिटी इनिशिएटिव्ह’ने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी अमेरिकेतील सर्व लोकांना हिंदूंच्या विरोधात संघटित होण्याची हाक दिली आहे. ‘दक्षिण आशिया सॉलिडिरिटी इनिशिएटिव्ह’ने त्यांच्या ट्वीटमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदु परिषद यांच्यावर टीका केली आहे. याशिवाय ‘हिंदु राष्ट्रवादाला आता ‘नाही’ म्हणण्याची वेळ आली आहे’, असे चिथावणीखोर विधाही य संघटनेने केले आहे.
‘दक्षिण आशिया सॉलिडिरिटी इनिशिएटिव्ह’ ही संघटना ‘स्टँड विथ काश्मीर’ या फुटीरतावादी संघटनेसमवेत काम करते. ‘स्टँड विथ काश्मीर’ ही संघटना भारतातील सीएए कायद्याच्या विरोधात सक्रीय होती. ती पाकची समर्थक संघटनाही मानली जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात