चीन या माध्यमातून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र भारताने त्यास भीक न घालता जशासतसे उत्तर देत राहिले पाहिजे !
लेह (लडाख) : चीनने लडाखजवळील त्याच्या सीमेवरील काशगर येथील वायूदलाच्या तळावर अण्वस्त्रांचा मारा करता येणारी ‘एच्-६’ ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ‘एच्-६ बॉम्बर’ विमाने शस्त्रसज्ज आहेत. उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रांतून ही माहिती समोर आली आहे. घेतलेले
पूर्व लडाखमधील पँगाँग तलावापासून काशगर येथील वायूदलाचे तळ ६९० किलोमीटर अंतरावर आहे. या तलाव क्षेत्रातून चिनी सैन्य अजूनही पूर्णपणे मागे हटलेले नाही. त्यामुळे तणावाची स्थिती कायम आहे. ‘एच्-६’ ही विमाने ५ सहस्र किलोमीटरपर्यंत जाऊन मारा करू शकतात. याशिवाय चीनने येथे अन्य लढाऊ विमानेही तैनात केली आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात