ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची राममंदिराची पुन्हा मशीद करण्याची अप्रत्यक्ष धमकी
- ‘सुंभ जळाला, तरी पिळ कायम’ अशा वृत्तीच्या धर्मांधांच्या संघटना !
- सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मुसलमान संघटना अशा प्रकारचे विधान करणार असतील, तर तो न्यायालयाचा अवमानच आहे. याविरोधात आता न्यायालयाने कारवाई करावी, असे हिंदूंना वाटते !
नवी देहली : बाबरी ‘मशीद’ होती आणि नेहमीच ‘मशीद’ राहील. तुर्कस्थानमधील ‘हागिया सोफिया’ याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. अन्यायपूर्ण, दमनकारी, लज्जास्पद आणि बहुसंख्याकांचे लांगूलचालन यांद्वारे दिलेल्या निर्णयाद्वारे भूमीवर पुनर्निर्माण करून ते पालटता येणार नाही. दुःखी होण्याची आवश्यकता नाही. कोणतीही स्थिती नेहमीसाठी रहात नाही, असे धमकीवजा ट्वीट ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’कडून अधिकृतरित्या करण्यात आले.
काय आहे ‘हागिया सोफिया’ ?
तुर्कस्थानमध्ये दीड सहस्र वर्षांपूर्वी चर्च बांधण्यात आले होते. त्याचे नाव हागिया सोफिया होते. इस्लामी आक्रमकांनी काही शतकांनंतर त्याची मशीद बनवली गेली. वर्ष १९३४ मध्ये मशिदीचे रूपांतर संग्रहालयात करण्यात आले आणि आता त्याचे पुन्हा मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात