भारताने केवळ फटकारून थांबू नये, तर तैवान आणि हाँगकाँग यांच्या विरोधातील चीनच्या कारवाया आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडून त्याला जशासतसे उत्तर द्यावे !
न्यूयॉर्क (अमेरिका) – चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जम्मू-काश्मीर या भारताच्या केंद्रशासित प्रदेशासंदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर भारताने ‘आमच्या अंतर्गत विषयांत चीनचा हस्तक्षेप आम्हाला अजिबात मान्य नाही’, अशा शब्दांत चीनला फटकारले. ‘चीनने पहिल्यांदाच भारताचा अंतर्गत विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केलेला नाही.
India also snubbed China and asked it to refrain from interfering in India’s internal affairs, just hours after Beijing termed the revoking of Article 370 a year ago by New Delhi as “illegal and invalid”#Kashmir#UNSC#indiachina https://t.co/TUdTf9U06z
— Deccan Chronicle (@DeccanChronicle) August 6, 2020
यापूर्वीसुद्धा चीनच्या अशा प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे’, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकात म्हटले आहे. ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रहित करण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त चीन आणि पाक यांच्याकडून हा प्रकरणी हस्तक्षेप करण्याचा हा प्रयत्न करण्यात आला.