- पाकमधील पीडित हिंदूंसाठी भारत सरकारने आता तरी आवाज उठवावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
- भारतात अल्पसंख्यांवरील कथित अत्याचारांच्या बाबतीत सजग रहाणारी जागतिक मानवाधिकार संघटना पाकमधील अल्पसंख्य हिंदूंच्या नरकयातनांविषयी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या ! अशा दुटप्पी संघटनांना सरकारने जाब विचारायला हवा !
सिंध – गरीबी आणि अत्याचार यांनी त्रस्त होऊन पाकच्या सिंध प्रांतातील बादिन जिल्ह्यातील हिंदू इस्लाम स्वीकारत असल्याचे समोर आले आहे. अरबी आयते वाचून इस्लाम स्वीकारल्यानंतर लगेचच हिंदु पुरुषांची सुंता केली जात आहे.
येथे हिंदूंना सामूहिकपणे भेदभावाला सामोरे जावे लागत होते. घर विकत घेणे, नोकरी मिळवणे, सरकारी सुविधांचा लाभ मिळणे यांसाठी त्यांना अत्यंत संघर्ष करावा लागत होता. आता मात्र इस्लाम स्वीकारल्यापासून या हिंदू समाधान व्यक्त करत आहेत. याशिवाय अत्याचार आणि हिंसा यांपासूनही त्यांची सुटका झाल्याचे सांगत आहेत.
जून मासात धर्मांतर करून आता अस्लम शेख बनलेले सावन भील म्हणाले की, मौलाना आणि धार्मिक संघटना हे अशा धर्मांतरासाठी पुढाकार घेतात. यासाठी हिंदूंना नोकरी देणे, भूमी देणे अशी आमीषे दाखवली जातात. आमची अगोदरच गरीबी असतांना आजच्या कोरोनाच्या महामारीत त्यांत आणखीनच भर पडली आहे. श्रीमंत मुसलमानांकडून अन्य मुसलमानांना साहाय्य केले जाते. आता आम्हालाही ते मिळेल. प्रत्येक जण आपापाल्या समुदायाला साहाय्य करतच असतो. तथापि देशात अन्य हिंदूंना साहाय्य करायला येथे हिंदू शिल्लकच राहिलेले नाहीत.’