Menu Close

मशीद बनवण्‍यासाठी मंदिर पाडले जाऊ शकते : ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्‍यक्ष साजिद रशीदी

‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्‍यक्ष साजिद रशीदी यांची राममंदिरावरून धमकी

  • मशीद बांधण्‍यासाठीच अयोध्‍येतील रामजन्‍मभूमीवर राजा विक्रमादित्‍य यांनी बांधलेले भव्‍य राममंदिर बाबरने पाडून तेथे बाबरी मशीद बांधली होती. काशी आणि मथुरा यांसह देशातल लक्षावधी ठिकाणी इस्‍लामी आक्रमकांनी हेच केले. आताही ते तेच करण्‍याची धमकी हिंदूंना देत आहेत. आतातरी हिंदू एकतर्फी धर्मनिरपेक्षतेचे पालन थांबवून वस्‍तूस्‍थितीकडे डोळे उघडे ठेवून पाहतील अशी अपेक्षा !
  • राममंदिर बांधण्‍यासह त्‍याचे रक्षण करण्‍याची सिद्धता हिंदूंमध्‍ये आहे का ? इतिहासामधून हिंदूंनी काहीच न शिकल्‍याने काश्‍मीरमधून हिंदूंना हाकलण्‍यात आले आणि तेथील काही सहस्र मंदिरांवर अतिक्रमणे झाली. अशी स्‍थिती संपूर्ण देशात येण्‍यापूर्वीच हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करा !
  • असे विधान केल्‍यावरून आता केंद्र सरकारने सर्वोच्‍च न्‍यायालयाचा अवमान करणे आणि देशात जातीय तणाव निर्माण करणे, या गुन्‍ह्यांखाली अशा धर्मांधांना आजन्‍म कारागृहात डांबले पाहिजे !

नवी दे हली  : इस्‍लाममध्‍ये अशी मान्‍यता आहे की, मशीद नेहमी मशीदच राहील. दुसर्‍या एखाद्या गोष्‍टीच्‍या निर्मितीसाठी मशीद पाडली जाऊ शकत नाही. आमच्‍या मान्‍यतेनुसार बाबरी मशीद तेथे होती आणि तेथे नेहमी मशिदीच्‍या रूपातच राहील. मंदिर पाडून मशिदीची निर्मिती करण्‍यात आली नव्‍हती; मात्र आता असे होऊ शकते. मशीद बनवण्‍यासाठी मंदिर पाडले जाऊ शकते, अशी धमकी ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्‍यक्ष साजिद रशिदी यांनी राममंदिराच्‍या भूमीपूजनानंतर केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *