Menu Close

हिंदूंची मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि परिसरातील व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ

समाजविघातक परिणामांकडे दुर्लक्ष करून मद्याची दुकाने उघडण्यात तत्परता दाखवली जाते; मात्र मंदिरे खुली करण्यात आढेवेढे घेतले जातात, हे दुर्दैवी नव्हे का ? मंदिरे खुली असण्यावर ज्यांचा रोजगार अवलंबून आहे, अशांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यायला हवी !

पुणे  : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दळणवळण बंदी लागू केल्यापासून राज्यातील सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे बंद आहेत. भाविकांना तेथे येण्यास अनुमती नाही. यामुळे मंदिरांवर ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, अशा कुटुंबांचे जगणे अवघड झाले आहे.

पंढरपूर, कोल्हापूर, जेजुरी, आळंदी आदी महत्त्वाच्या मंदिरांच्या ठिकाणची ७५ टक्के अर्थव्यवस्था भाविकांवर अवलंबून असते. मंदिराबाहेरील छोट्या व्यवसायिकांना प्रत्येक दिवस ढकलणे कठीण झाले आहे. सहस्रो पुरोहितांना कामे मिळू न शकल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. दळणवळण बंदीचे नियम शिथिल झाल्यानंतर अन्य उद्योग चालू झाले असले, तरीही मंदिर परिसरात शुकशुकाटच आहे. भाविकांनीही मंदिरे उघडण्याची मागणी करूनही अद्याप मंदिरे बंदच आहेत. ‘सर्वच ठिकाणी नियमावली घोषित केली, तशी नियमावली करून सर्व मंदिरे देवदर्शनासाठी खुली करावीत’, अशी या तीर्थक्षेत्रातील ग्रामस्थांची मागणी आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *