राममंदिराच्या भूमीपूजनाचे औचित्य !
या देशातील ९९ टक्के अल्पसंख्यांकांचे पूर्वज हिंदू आहेत आणि ते त्यांनाही ठाऊक आहे; मात्र कट्टरतेमुळे आणि भीतीपोटी ते त्याचा त्याग करून पुन्हा हिंदु धर्मात येण्यास घाबरत आहेत. त्यामुळे गेल्या एक सहस्र वर्षांत ज्या हिंदूंना बाटवून मुसलमान आणि ख्रिस्ती करण्यात आले अन् त्यांतील ज्यांना स्वच्छेने पुन्हा हिंदु धर्मात यायचे आहे, अशांना हिंदु धर्मात घेण्यासाठी केंद्र सरकारने योजना बनवावी, तसेच त्यांना संरक्षण द्यावे, असे हिंदूंना वाटते !
जयपूर (राजस्थान) : राममंदिराच्या भूमीपूजनाचे औचित्य साधून राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील मोतीसरा गावात रहाणार्या ५० मुसलमान कुटुंबियांनी हिंदु धर्मात प्रवेश केला. या कुटुंबियांनी म्हटले की, ‘आमचे पूर्वज हिंदू होते. इतिहासाचे ज्ञान असल्यामुळे आम्ही कोणत्याही दबावाविना स्वेच्छेने हिंदु धर्म स्वीकारला आहे.’
हिंदु धर्म स्वीकार करणारे सुभनराम यांनी सांगितले, ‘‘मोगल काळात त्यांच्या पूर्वजांना धमकावून मुसलमान धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते; मात्र याविषयी कळल्यानंतर ‘आम्ही हिंदु आहोत आणि आम्हाला पुन्हा याच धर्मात जायचे आहे’, असे ठरवले. मुसलमान आमच्यापासून अंतर ठेवतात. आमच्या प्रथा संपूर्ण हिंदु धर्माशी संबंधित आहेत. यानंतर संपूर्ण कुटुंबाने हिंदु धर्मात परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ५० मुसलमान कुटुंबियांतील २५० सदस्यांनी धार्मिक विधी करून हिंदु धर्माचा स्वीकार केला.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात