Menu Close

नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन : ‘पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील हिंदूंचे वाढते धर्मांतर’ या विषयावर मान्‍यवरांचे विचार !

‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या सहाव्‍या दिवशी आयोजित परिसंवादात मान्‍यवरांचे विचार !

धर्मांतर रोखण्‍यासाठी धर्मांतर विरोधी कायदा करण्‍यासह हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्‍यक !

नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या सहाव्‍या दिवशी ‘पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील हिंदूंचे वाढते धर्मांतर’ या विषयावर मान्‍यवरांनी त्‍यांचे विचार मांडले. हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच अनेक संमस्‍यांना सामोरे जावे लागत आहे. त्‍यांतील धर्मांतर ही एक समस्‍या पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात ही समस्‍या मोठ्या प्रमाणात हिंदूंना भेडसात आहे. या समस्‍येवर मान्‍यवर वक्‍त्‍यांनी प्रकाश टाकला. वक्‍त्‍यांनी ‘धर्मांतर बंदी कायद्या’ची अपरिहार्यता अधोरेखित केली, तसेच धर्मांतर झालेल्‍यांना पुन्‍हा हिंदु धर्मात घेण्‍यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्‍यावरही जोर दिला. या भाषणांचा सारांश येथे देत आहे.

मुलांना ख्रिस्‍ती शाळांमध्‍ये घालणे, ही त्‍यांच्‍या धर्मांतराची पहिली पायरी ! – पू. स्‍वामी चित्तरंजन महाराज, शांती काली आश्रम, त्रिपुरा

इंग्रजी शिक्षणाच्‍या मोहापायी काही हिंदु पालक त्‍यांच्‍या लहान मुलांना ख्रिस्‍ती शाळेत भरती करतात. येथूनच धर्मातरास प्रारंभ होतो. आम्‍ही शांती काली आश्रमाच्‍या वतीने २६ आश्रमांची स्‍थापना केली असून त्‍यांतील ४ आश्रमात आदिवासी विद्यार्थ्‍यांसाठी विनामूल्‍य शिक्षण, भोजन, निवास व्‍यवस्‍था केली जाते.

धर्मांतराची समस्‍या रोखण्‍यासाठी स्‍वयंसेवी संस्‍थांना विदेशातून मिळणारा पैसा रोखायला हवा ! – डॉ. नील माधव दास, संस्‍थापक अध्‍यक्ष, तरुण हिंदू , झारखंड

गेल्‍या सरकारच्‍या काळात धर्मांतराच्‍या विरोधात कठोर शासन केले जायचे. त्‍यामुळे अशा घटना अल्‍प झाल्‍या होत्‍या; मात्र विद्यमान सरकारमधील काही मंत्री निवडणुकीपूर्वीच मिशनरी, पाद्री किंवा मौलवी यांना भेटतात. धर्मांतरासाठी केवळ पैसाच नाही, तर मद्यही पुरवले जाते. काही हिंदू चर्चमध्‍ये जातात. तेथे त्‍यांचा भव्‍य सत्‍कार केला जातो. त्‍यामुळे मोहित होऊन ते धर्मांतरास बळी पडतात. धर्मांतरित हिंदूंसाठी तात्‍काळ चर्च निर्माण केली जातात. हिंदूंनी विरोध केल्‍यास निधर्मी राज्‍यकर्ते, पोलीस हे हिंदूंचेच दमन करतात. ख्रिस्‍ती धर्माच्‍या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्‍वयंसंस्‍था कार्यरत असून त्‍यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्‍य केले जाते. विदेशातून हा पैसा उपलब्‍ध होतो. या स्‍वयंसेवी संस्‍था यातील १० टक्‍के रक्‍कम स्‍वतःसाठी तर ९० टक्‍के रक्‍कम चर्चसाठी वापरतात. धर्मांतराची समस्‍या रोखायची असेल, तर केंद्र सरकारने अशा संस्‍थांना विदेशातून मिळणारे अर्थसाहाय्‍य तात्‍काळ खंडित करायला हवे.

बंगालमध्‍ये धर्मांतरविरोधी कायदा लागू करून त्‍याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्‍यक ! – डॉ. कौशिकचंद्र मल्लिक, शास्‍त्रधर्म प्रचार सभा, बंगाल

बंगालमधील हिंदूंची स्‍थिती ही खाटिकाच्‍या दारात उभ्‍या केलेल्‍या बोकडाप्रमाणे झाली आहे. ममता बेगमचे सरकार सत्तेत आल्‍यापासून ही स्‍थिती अधिकच दयनीय झाली आहे. दुर्गापूजनास झालेला विरोध सर्वश्रुत आहे. दुर्गापूजनाच्‍या वेळी एके ठिकाणी सर्वधर्मसमभाव या भंपक कल्‍पनेच्‍या नावाखाली एका राजकीय व्‍यक्‍तीने ‘अजान’चे आयोजन केले होते. हे थांबवण्‍यासाठी राज्‍यात धर्मपरिवर्तन कायदा लागू करून त्‍याची  प्रभावी कार्यवाही करणे आवश्‍यक असून घुसखोरीलाही आळा घालणे आवश्‍यक आहे. बंगालमध्‍ये नागरिकत्‍व सुधारणा कायदा लागू करून संपूर्ण राज्‍यात धर्मशिक्षण देण्‍याची व्‍यवस्‍था करावी लागेल.

लव्‍ह जिहादची ७० ते ८० टक्‍के प्रकरणे समुपदेशाने सोडवत आहोत ! – अधिवक्‍ता राजीवकुमार नाथ, विधीप्रमुख, हिंदु जागरण मंच, आसाम

आसाममध्‍ये धर्मांतर आणि लव्‍ह जिहाद या समस्‍या दिवसेंदिवस वाढत आहेत. लव्‍ह जिहादची ७० ते ८० टक्‍के प्रकरणे समुपदेशनाने सोडवत आहोत. देशात हिंदु मुलींना मुसलमान तरुण पळवून नेतात. त्‍यांच्‍याशी बळजोरीने निकाह केला जातो. हिंदूंनी जागृत आणि सतर्क होण्‍याची आवश्‍यकता आहे.

धर्मांतरामुळे संस्‍कृतीही धोक्‍यात येते ! – कुरु थाई, अरुणाचल प्रदेश

लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी येथील चर्चच्‍या वतीने ‘केवळ ख्रिस्‍ती उमेदवारांनाच मतदान करावे’, अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध केले होते. येथेही पर्यटनाच्‍या नावाखाली ‘धर्मांतर’ केले जाणे, ही गंभीर समस्‍या आहे. काही धर्मांतरित हिंदू पूर्वी ते ज्‍या जातीत होते, त्‍यांना मिळणारा लाभ उठवतातच. त्‍यासह धर्मांतर झाल्‍यानंतर अल्‍पसंख्‍यांक होण्‍याचाही लाभ उठवतात. धर्मांतरासमवेत संस्‍कृतीही धोक्‍यात येते.

मेघालयात ख्रिस्‍ती आणि मुसलमान पद्धतीने विवाह केलेले चालतात; मात्र हिंदु पद्धतीने केलेले विवाह चालत नाहीत ! – श्रीमती इस्‍टर खरबामोन, सामाजिक कार्यकर्ता, मेघालय

मेघालयमध्‍ये मोठ्या संख्‍येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्‍या आहे. येथे हिंदूंना ‘दखार’ (दखार म्‍हणजे जो ख्रिस्‍ती नाही तो) संबोधून हिणवले जाते. ख्रिस्‍ती लोकांना शिष्‍यवृत्ती, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, उच्‍च दर्जाची नोकरी या गोष्‍टी विनाअट मिळतात; मात्र हिंदूंना त्‍यापासून दूर ठेवले जाते. ख्रिस्‍ती आणि मुसलमान पद्धतीने केलेल्‍या विवाहांना मान्‍यता आहे ; मात्र हिंदु पद्धतीने केलेले विवाह मान्‍य नाहीत. आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे की, ‘दखार’ हा शब्‍द काढून टाकण्‍यात यावा’, तसेच ‘अन्‍य धर्मियांच्‍या विवाहाप्रमाणेच हिंदूंच्‍या विवाहाला मान्‍यता मिळावी’ आणि ‘ख्रिस्‍ती, मुसलमान यांना धार्मिक संस्‍थांकडून शिक्षण न देता सरकारच्‍या वतीने शिक्षणाची सुविधा उपलब्‍ध करून द्यावी.’

‘मणिपूर येथे भगवान श्रीकृष्‍णाचे भव्‍य मंदिर असून ‘गोविंद’ या नावाने लोक त्‍याचे पूजन करतात. धर्मपरिवर्तन मोठ्या प्रमाणात होत असून केवळ ४० टक्‍के हिंदू येथे शेष आहेत. पूर्वोत्तर राज्‍यांना भारतापासून वेगळे करण्‍याचे षडयंत्र आहे.’ – श्री. दिमबेश्‍वर शर्मा, इंफाळ, मणिपूर.

सर्व संतांसह प्रत्‍येक व्‍यक्‍तीने संस्‍कृती रक्षणासाठी योगदान द्यावे ! –  प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्‍यजी महाराज, अध्‍यक्ष, अखिल भारतीय वर्षीय धर्मसंघ

अवतार आणि संत यांच्‍या रूपात अवतीर्ण होऊन भगवंत धर्माची स्‍थापना करतात. प्रभु श्रीराम यांनीही तेच कार्य केले. अशाच प्रकारे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना आपणाला करायची आहे. आपली सनातन संस्‍कृती कुणा व्‍यक्‍तीने नव्‍हे, तर वेदांपासून निर्माण झाली आहे. सध्‍या मात्र पाश्‍चात्‍य संस्‍कृतीचे अंधानुकरण चालू आहे. पाश्‍चात्त्य संस्‍कृती अंगीकारून कधीही विकास होऊ शकत नाही. पाश्‍चात्‍य संस्‍कृतीने केवळ भोग भोगता येतात; मात्र भगवंताची प्राप्‍ती होऊ शकत नाही. भारतामध्‍ये जन्‍म घेणार्‍या प्रत्‍येक जिवाला परमेश्‍वराची प्राप्‍ती करता येणे शक्‍य आहे. या भूमीत जन्‍माला येणार्‍या प्राणीमात्रांनाही जे भाग्‍य लाभले आहे, ते पाश्‍चात्त्य देशांतील अधिनायकांनाही लाभलेले नाही. त्‍यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सभ्‍यता, संस्‍कृती, गोमाता आणि वर्णाश्रमव्‍यवस्‍था यांच्‍या रक्षणाकडे लक्ष द्यावे. या पावन संस्‍कृतीच्‍या रक्षणासाठी सर्व संत आणि प्रत्‍येक हिंदू यांनी योगदान द्यावे. ज्‍या राज्‍यात धर्माचे आचरण होते, त्‍या राज्‍यावर संकट येत नाही. धर्माचे अधिष्‍ठान असल्‍याविना राजा चांगले शासन करू शकत नाही. श्रीरामांनी ज्‍या प्रमाणे आदर्श राज्‍याची निर्मिती केली, अशाच हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना आपणाला करायची आहे. त्‍यासाठी भगवंताने आपणाला दूत म्‍हणून पाठवले आहे, हे लक्षात घेऊया.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *