काँग्रेसने लोकशाहीचा खुन करून राज्यघटनेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द घातले आहेत. ते भाजप सरकारने संसदेत प्रस्ताव संमत करून काढून टाकून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द घालून भारताला अधिकृतरित्या ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, असे धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !
नवी देहली : एम्.आय.एम्.चे असदुद्दीन ओवैसी यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, जर पाकिस्तान मुसलमानबहुल असल्याने इस्लामी राष्ट्र होऊ शकते, तर भारत हिंदू बहुसंख्यांक असल्यामुळे हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ?’, असा प्रश्न आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी विचारला आहे. ओवैसी यांनी अयोध्येतील राममंदिराच्या भूमीपूजनानंतर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली होती. त्यावर महंत नरेंद्र गिरि यांनी हे उत्तर दिले आहे.
भारत हिंदु राष्ट्रच, येथे सर्व धर्मांचा सन्मान होतो !
महंत गिरि पुढे म्हणाले, ‘‘वास्तविक भारत हे हिंदु राष्ट्रच आहे; परंतु येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. इतर धर्मांचे आचरण करणार्यांचाही आम्ही सनातनी लोक सन्मान करतो. त्यांची गळाभेट घेतो, त्यांच्या प्रती आस्था राखतो; परंतु जेव्हा कुणी आमच्या धर्माला आव्हान देतो आणि अपमानजनक शब्दांचा उच्चार करतो, तेव्हा आम्ही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहमी सिद्ध असतो.’’
काशी आणि मथुरा हेही मुक्त करायचे आहेत !
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीची लढाई आता संपुष्टात आली आहे. आता काशी आणि मथुरा येथील मंदिरे मुक्त करण्याची वेळ आली आहे. काशी आणि मथुरा (येथील मंदिरांच्या बाजूला असलेल्या अवैध मशिदी) हा हिंदूंसाठी कलंक आहे. तो मिटवणे आता आवश्यकच आहे; मात्र शांतीपूर्ण पद्धतीने आंदोलन आणि न्यायप्रक्रिया यांद्वारे लढाई लढत काशी आणि मथुरा मुक्त करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
श्रीराममंदिर राज्यघटनेच्या कक्षेतच उभारले जात आहे !
श्रीराममंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यघटनेच्या कक्षेत राहूनच उभारले जात आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या आमंत्रणानंतरच अयोध्येला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमीपूजन केले. मंदिर उभारणीसाठी हिंदूंनी शेकडो वर्षे प्रतीक्षा केली आणि न्यायालयाच्या निर्णयाचीही प्रतीक्षा केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात