- धर्मांध कसायांमुळे निष्पाप गायींच्या केल्या जाणार्या हत्यांमुळे त्यांचे जगणे कठीण झाले आहे, याविषयी ओवैसी का बोलत नाहीत ?
- अवैधरित्या गोतस्करी करणारे त्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करतात, तसेच गोरक्षकांची अमानुषपणे हत्या करतात. यांच्याविषयी ओवैसी का बोलत नाहीत ? हे त्यांना मान्य आहे का ?
- अनेक राज्यांत गोहत्याबंदी असतांनाही होणारी गोहत्या रोखण्यासाठी ओवैसी का बोलत नाहीत किंवा कृती करत नाहीत ? कि ‘धर्मांध कसायांनी कायदाद्रोह करणे योग्य आहे’, असे त्यांना म्हणायचे आहे ?
- काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांमुळे आणि मुसलमानबहुल भागांमध्ये हिंदूंचे जगणे कठीण झाले आहे, हे ओवैसी यांना का दिसत नाही ?
भाग्यनगर (तेलंगाणा) : गोरक्षकांमुळे मुसलमानांचे जगणे कठीण झाले आहे. त्यांना जगण्याची भीती वाटत आहे. या गटावर त्वरित कारवाई करून त्यांना शिक्षा द्यायला हवी; मात्र केंद्र सरकारचे काही मंत्री या गोरक्षकांच्या गळ्यात माळा घालत आहेत आणि काहींवर केलेल्या कारवाईत गडबड करून त्यांना मुक्त केले जात आहे. त्यामुळेच त्यांचे धाडस वाढले आहे, असे ट्वीट एम्.आय.एम्.चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी हरियाणा येथील गुरुग्राम येथे गोरक्षकांनी अवैधरित्या मांस घेऊन जाणार्या व्यक्तीला मारहाण केली होती आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. याविषयी ओवैसी यांनी हे ट्वीट केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात