Menu Close

चीनकडून देहलीपर्यंत मारा करू शकणार्‍या अण्वस्त्रावाहू क्षेपणास्त्राची चाचणी

भारतीय सैन्याने युद्धसज्ज रहाणे किती अपरिहार्य आहे, हे यातून स्पष्ट होते !

बीजिंग (चीन) : चीनने ‘डीएफ्-२६’ आणि ‘डीएफ्-१६’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. ही क्षेपणास्त्रे देहलीपर्यंत मारा करू शकतात. ‘डीएफ्-२६’ हे क्षेपणास्त्र ४ सहस्र किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. यात भारतासह प्रशांत महासागरामधील अमेरिकेचे गुआम हे नौदलाचे तळही क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येते. या क्षेपणास्त्रामध्ये १ सहस्र २०० ते १ सहस्र ८०० किलोग्रॅम एवढे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. ‘डीएफ् १६’ ची मारक क्षमता ८०० ते १ सहस्र किलोमीटर इतकी आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *