५ऑगस्ट २०२० हा समस्त हिंदू आणि रामभक्त यांच्यासाठी सुवर्णक्षण लाभलेला दिवस ठरला ! सर्वांच्या मनामनात हिंदुत्व चेतवले गेले. पंतप्रधानानांनी केलेल्या श्रीराममंदिराच्या भूमीपूजनामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा पायाच रोवला गेला. या घटनेमुळे हिंदूबहुल भारतासाठी हिंदुत्वाच्या विजयाची पताकाच सर्वदूर फडकली आहे. अर्थात् हिंदु, हिंदुत्व, हिंदूंच्या देवता यांच्या संदर्भात एखादी सकारात्मक घटना घडली की, हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला नाही तरच नवल ! हिंदुत्वविरोधी गरळओक करण्यात जणू चढाओढ लागावी कि काय, अशा प्रकारे हिंदुद्वेष्ट्यांनी त्या चर्चेत उड्या घेतल्या. ‘पंतप्रधानांनी श्रीरामजन्मभूमीच्या कार्यक्रमात भाग घेऊन पंतप्रधान म्हणून घेतलेल्या शपथेचे उल्लंघन केले आहे. त्यांनी घटनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ या तत्त्वाचेही उल्लंघन केले आहे. जेथे भूमीपूजन झाले, तेथे ४५० वर्षांपासून मशीद उभी होती’, असे विधान एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले. सहस्रो वर्षांपासून जेथे मंदिर होते, ते पाडून मशीद बांधली गेली, हे सत्य अनेक पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. असे असतांना ओवैसी यांच्या ढोंगीपणाला काय म्हणावे ? ‘भूमीपूजनामुळे हिंदु राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे’, अशी द्वेषमूलक टीका जरी ओवैसींनी केले असली, तरी त्यांचे विधान म्हणजे एकप्रकारे हिंदुत्व आणि सत्य यांचा झालेला विजयच आहे. अशी विधाने करून त्यांनीच एकप्रकारे स्वतःचे हसे करून घेतले आहे. ‘बाबर जिवंत आहे’, असेही ओवैसींनी म्हटले खरे; पण राममंदिरासाठी घरादाराचा विचार न करता ज्या कारसेवकांनी त्यांच्या प्राणांचे बलीदान दिले, अशा खर्या रामभक्तांच्या बलीदानामुळे ‘बाबर’ कधीच गाडला गेला आहे, हे ओवैसींनी लक्षात घ्यावे. सर्वत्रचे हिंदू आता जागृत झाले आहेत. त्यामुळे इतकी वर्षे श्रीराममंदिराच्या नावावर धार्मिक राजकारण करणार्या आणि भविष्यातील जिना होऊ पहाणार्या ओवैसींनी आता त्यांची पावले विचारपूर्वक टाकावीत, अन्यथा हिंदूंच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल.
भगवेकरण आणि विरोध
ओवैसींसारखी हिंदुत्वराहू देत आहे, अशा भारतात कायदाद्रोही विधाने करून मुसलमानांना चिथावू पहाणार्यांना येथे स्थान नाही. त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये चालते व्हावे, ही सर्वच रामभक्तांच्या मनातील भावना आहे. ओवैसी काय किंवा बर्क काय यांची हिरवी पिलावळ हिंदुद्वेषी विधाने करतच रहाणार आहे; पण हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने वाटचाल करणारा भारत आता त्यांच्याकडे ढुंकूनही पहाणार नाही.
हिंदुत्वपूरक भारत !
श्रीराममंदिराच्या भूमीपूजनानंतर जरी विरोध झाला, तरी देशात काही सकारात्मक घटनाही घडल्या. काही घटनांमुळे हिंदूंना पूरक वातावरणही निर्माण झाले. भूमीपूजनाचे औचित्य साधून राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील मोतीसरा गावातील ५० मुसलमान कुटुंबियांनी म्हणजे २५० जणांनी हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यांच्या पूर्वजांना मोगलांच्या काळात बाटवण्यात आले होते. ही हिंदूंसाठी खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि हिंदुद्वेष्ट्यांना मात्र सणसणीत चपराक ! ‘आतापर्यंत मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मांत बाटवल्या गेलेल्या सहस्रावधी हिंदूंनाही लवकरात लवकर हिंदु धर्माचा स्वीकार करता यावा’, हेसुद्धा हिंदूबहुल भारतासमोरील आव्हानच आहे. श्रीराम आणि राममंदिर यांना आतापर्यंत काल्पनिक ठरवून प्रत्येक वेळी टीकास्त्र उगारणारे पुरो(अधो)गामी, बुद्धीप्रामाण्यवादी, साम्यवादी आणि हिंदुद्वेष्टे यांची तर भूमीपूजन सोहळ्याच्या दिवशी जणू दातखिळीच बसली असावी. त्यांनी चकार शब्दही काढला नाही. धर्मनिरपेक्षतेमुळे हिंदुत्वासाठी कधीही स्वतःचे व्यासपीठ वापरू न देणार्या आणि श्रीरामाला विरोध करणार्या साम्यवाद्यांची बाजू घेऊन चर्चासत्रे आयोजित केलेल्या वृत्तवाहिन्यांवर भूमीपूजनानिमित्त श्रीरामाचे गुणगान करता येईल, असे कार्यक्रम दाखवण्याची वेळ आली होती. प्रत्येक वेळी हिंदुद्वेषाचा राग आळवणार्यांना अयोध्येतील भगवेमय आणि हिंदुतेजाने भारलेले वातावरण पाहून प्रभु श्रीराम अन् हिंदु धर्म यांच्याप्रती आदर राखत भक्तीभावपूर्ण स्वरूपाचे वृत्तांकन, तसेच सूत्रसंचालन करावे लागले. या वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात असे प्रथमच घडले ! इतकी वर्षे श्रीरामाचे अस्तित्व नाकारणार्या गांधी कुटुंबियांवर नाईलाजास्तव श्रीरामाचे गुणवर्णन करायची वेळ आली आहे. या सर्व घटना म्हणजे हिंदूंनी विजयाच्या दिशेने टाकलेले एकेक पाऊलच म्हणावे लागेल. रामराज्य आता दूर नाही. काळानुसार ही पावलेच हिंदु राष्ट्राची म्हणजेच रामराज्याची स्थापना करून हिंदुत्वविरोधी शक्तींना नामोहरम करणार आहेत. हिंदूंनो, भूमीपूजन तर झाले, आता श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी आणि पर्यायाने रामराज्याच्या स्वागतासाठी सिद्ध व्हा !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात