Menu Close

नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या आठव्‍या दिवशी ‘राष्ट्ररक्षा’ या विषयावर मान्‍यवरांचे उद़्‍बोधक विचार

‘वफ्‍क बोर्डा’ च्‍या नावाखाली संपूर्ण देशभरात ‘लॅण्‍ड जिहाद’ चालू ! – पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन, अध्‍यक्ष, हिन्‍दू फ्रंट फॉर जस्‍टिस

पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन

फोंडा : संपूर्ण देशात वफ्‍क बोर्डाच्‍या नावाखाली ‘लॅण्‍ड जिहाद’ चालू आहे. ‘लव्‍ह जिहाद’पेक्षा हा जिहाद मोठा आहे. ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये हिंदूंच्‍या नारीशक्‍तीला फसवले जाते, तर ‘लॅण्‍ड जिहाद’द्वारे हिंदूंच्‍या मालमत्तेची लूट चालू आहे. सध्‍या अस्‍तित्‍वात असलेल्‍या काही कायद्यांद्वारे मुसलमानांना विशेष अधिकार देण्‍यात आले आहेत. ‘वफ्‍क बोर्डा’ ला देण्‍यात आलेल्‍या विशेषाधिकारामुळे देशभरात ‘लॅण्‍ड जिहाद’ चालू आहे, असे प्रतिपादन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्‍टिस’चे अध्‍यक्ष पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन यांनी केले. नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या आठव्‍या दिवशी ‘वक्‍फ बोर्डाच्‍या माध्‍यमातून चालू असेलेले हिंदुविरोधी आणि राष्‍ट्रविरोधी षड्‍यंत्र अन् त्‍याच्‍या प्रतिकाराची आवश्‍यकता’ या विषयावर ते बोलत होते.

ते पुढे म्‍हणाले

१. आतापर्यंत हिंदूंची वैयक्‍तिक, मंदिरांचे ट्रस्‍ट आणि शासकीय जमिनी ‘वफ्‍क बोर्डा’ ने कह्यात घेतल्‍या आहेत. यामुळे हिंदूंच्‍या संपत्तीचे विघटन चालू आहे. सद्य:स्‍थितीत भारतीय रेल्‍वेच्‍या नंतर सर्वाधिक जमिन ‘वफ्‍क बोर्डा’च्‍या नावे आहे.

२. वर्ष १९२३ मध्‍ये ‘वफ्‍क बोर्डा’ला सामान्‍य अधिकार होते; मात्र काँग्रेसची सत्ता आल्‍यानंतर अनुक्रमे वर्ष १९५४, १९९५ आणि २०१३ मध्‍ये ‘वफ्‍क बोर्डा’ला अधिकाधिक विशेषाधिकार देण्‍यात आले. परिणामी ‘वर्फ्‍क बोर्ड’ने हवी ती जमिन स्‍वत:च्‍या कह्यात घेतली आणि दुसर्‍या बाजूला हिंदू अजूनही निद्रिस्‍त आहेत.

३. हिंदु अधिवक्‍त्‍यांनी ‘वफ्‍क बोर्डा’विषयी कायद्याचा अभ्‍यास करायला हवा. देशभरात ‘वफ्‍क बोर्डा’ने कह्यात घेतल्‍या जमिनींचा सर्वप्रथम शोध घ्‍यायला हवा. ज्‍या जमिनींविषयी संबंधित मालकांना माहिती देण्‍यात आली नसेल, त्‍यांना कायदेशीर लढा देता येईल.

४. एखाद्या जमिनीवर ‘वफ्‍क बोर्डा’चा फलक लावण्‍यात आला असल्‍यास हिंदूंनी जागरूक रहावे. बंगाल, महाराष्‍ट्र, तामिळनाडू आणि केरळ या राज्‍यांत ‘वफ्‍क बोर्डा’ने मोठ्या प्रमाणात हिंदूंच्‍या जमिनी बळकावल्‍या आहेत. कायद्याचा उपयोग करून या जमिनी आपण पुन्‍हा मिळवू शकतो.

५. अशा प्रकरणांमध्‍ये आपण सर्वोच्‍च न्‍यायालयात न्‍याय मागू शकतो. यामुळे ‘वफ्‍क बोर्डा’च्‍या नावाखाली हिंदूंची मालमत्ता लुटण्‍याचा खेळ थांबवता येईल. याविषयी कार्यशाळा घेऊन हिंदूंना माहिती द्यायला हवी.

हिंदू संघटित झाल्‍यास हिंदु राष्‍ट्राची संकल्‍पना लवकर साकार होईल ! – डॉ. संतश्री पू. युधिष्‍ठिरलालजी महाराज, नवम पीठाधीश, पू.  शदाणी दरबार तीर्थ, छत्तीसगड

डॉ. संतश्री पू. युधिष्‍ठिरलालजी महाराज

आज विश्‍वभरातील हिंदूंनी आपल्‍या अंतर्मनातील हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचा विचार  व्‍यक्‍त करायला हवा, जेणेकरून सर्वत्रचे हिंदू जागृत होतील आणि राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी आवाज उठवतील. हिंदु राष्‍ट्र हे सत्‍यावर आधारित आहे. हिंदू न्‍यायप्रिय आणि परोपकारी आहेत. त्‍यामुळे मी सर्व राष्‍ट्रवासियांना आवाहन करतो की, त्‍यांनी हिंदु विचारानुसार जीवन व्‍यतित करावे. हिंदूंची मंदिरे केवळ डोके टेकण्‍यासाठी नाहीत. येथे भगवंताच्‍या दर्शनासह ज्ञान, पुरुषार्थ यांची शिकवण दिली जाते. देशात हिंदु राष्‍ट्र आल्‍यास सर्वांचे भले होईल. त्‍याकरता आपल्‍या पूर्वजांनी दिलेल्‍या मार्ग सोडू नका. आपण जेवढे लवकर संघटित होऊ, तेवढ्या लवकर हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचा संकल्‍प पूर्ण होईल. त्‍यासाठीच अष्‍टम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातून प्रेरणा घेऊन आम्‍ही छत्तीसगड येथे प्रांतीय अधिवेशन घेतले. अयोध्‍या येथील प्रभु श्रीरामाच्‍या मंदिराचे भूमीपूजनाने मागील अनेक वर्षांचे हिंदूंचे स्‍वप्‍न साकार होत आहे, याचा आम्‍हाला अभिमान आहे. आम्‍ही करत असलेल्‍या रामराज्‍याच्‍या संकल्‍पनेमध्‍ये चारही वर्ण सुखी रहातील. हिंदु राष्‍ट्राच्‍या माध्‍यमातून ही संकल्‍पना साकार होईल. ‘हिंदु राष्‍ट्र’ ही अशीच व्‍यवस्‍था आहे की, ज्‍यामध्‍ये मानवतेचा उत्‍कर्ष होईल. या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्‍या माध्‍यमातून हिंदु राष्‍ट्राची ही संकल्‍पना मांडली जात आहे, याचा आम्‍हाला अभिमान आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *