बेळगाव : मणगुत्ती ग्रामपंचायतीने ठराव करून गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसवला होता; मात्र अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हा पुतळा हटवल्याने या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलन करण्यात येत असून १० ऑगस्टअखेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा बसवला नाही, तर मणगुत्तीमध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याची चेतावणी सीमा भागातील मराठी बांधवांनी दिली आहे. (ग्रामपंचायतीने ठराव केल्यानंतर बेळगाव जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवणे हे अनाकलनीय आहे ! हा सरळसरळ शिवद्रोहच आहे ! – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात