जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्याला कोणताही देश कशाला स्वीकारील ? त्यामुळे त्याला पाठीशी घालण्याचे सोडून मलेशियाने त्याला भारताच्या कह्यात द्यावे, यातच शहाणपणा आहे !
कुआलालंपूर (मलेशिया) : ‘वादग्रस्त उपदेशक डॉ. झाकीर नाईक यांना मलेशियातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत; मात्र कोणताही देश त्यांना स्वीकारण्यास सिद्ध नाही, असे विधान मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर महंमद यांनी केले आहे. झाकीर गेल्या ४ वर्षांपासून भारतातून आतंकवाद्यांना साहाय्य केल्याच्या प्रकरणी पसार आहे. मलेशियाने त्याला आश्रय दिलेला आहे. त्या वेळी महातिर हेच मलेशियाचे पंतप्रधान होते. महातिर पुढे म्हणाले की, आम्हाला वाटते झाकीर भारतीय जनतेपासून सुरक्षित राहू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना सुरक्षित देशात पाठवू इच्छितो जेथे आम्हाला वाटते की, झाकीर सुरक्षित राहील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात