Menu Close

बंगाल : श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या दिवशी आयोजित केलेल्या पूजा पोलीस आणि धर्मांध यांनी आक्रमण करून रोखल्या

  • पोलिसांकडून हिंदूंना मंदिरांतून खेचून बाहेर काढून लाठीमार

  • काही मंदिरांची हानी

धर्मांधप्रेमी तृणमूल काँग्रेसला सत्तेत बसवणार्‍या बंगालमधील हिंदूंना ते पाकिस्तानमध्ये रहात असल्याचा अनुभव घ्यावा लागत आहेत. ही स्थिती पालटणेही आता त्यांच्यात हातात असून त्यांनी आता त्यांचे रक्षण करू शकणार्‍यांच्या हातात सत्ता दिली पाहिजे !

खरगपूर (बंगाल) : श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या म्हणजे ५ ऑगस्ट या दिवशी बंगालमध्ये अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये पूजा आयोजित करण्यात आल्या होत्या; मात्र पोलीस आणि धर्मांध यांनी मंदिरात घुसून त्या रोखल्याच्या घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. खरगपूर येथे काही ठिकाणी पोलिसांनी हिंदूंना मंदिरांतून खेचून बाहेर काढले आणि लाठीमार केला. यात काही मंदिरांचीही हानी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कोलकाता येथे भाजप आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी पूजेचे आयोजन केले होते. त्यातील काही ठिकाणी धर्मांधांच्या जमावाने आक्रमण केले. त्याला पोलिसांचेही समर्थन होते. येथील रझा बाजार येथे धर्मांधांनी प्रत्येक पूजेवर आक्रमण केले. धर्मांधांनी येथे लावण्यात आलेले भगवे झेंडेही काढून फेकून दिले. याविषयीचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

  1. Vinod K Dangwal

    हर हिंदुस्तानी की तीन माँ होती हैं:

    १.जन्मदात्री

    २.गौमाता

    ३.भारत माता

    जो इसे नहीं मानता वह हिन्दुस्तानी नहीं है!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *