- चांगली पत्नी बनून ज्याने मुसलमान बनवले त्याच्या समवेत रहा !
- पाकिस्तानमधील उच्च न्यायालयेही धर्मांध आहेत, हे यातून स्पष्ट होते. अशा पाकमध्ये अल्पसंख्यांकांना कधीतरी न्याय मिळेल का ?
- एरव्ही हिंदूंना सल्ले देणारे भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी ख्रिस्ती याविषयी बोलतील का ?
लाहोर (पाकिस्तान) : येथील मारिया शहबाज या १४ वर्षांच्या ख्रिस्ती मुलीचे एप्रिल मासामध्ये महंमद नक्श आणि त्याच्या सहकार्यांनी अपहरण केले होते. तिचे धर्मांतर करून महंमद नक्श याच्याशी विवाह लावून देण्यात आला होता. या प्रकरणी फैसलाबाद न्यायालयाने तिची सुटका करून तिला पुनर्वसन केंद्रात ठेवण्याचा आणि तिच्याकडे लक्ष देण्याचा आदेश दिला होता; मात्र लाहोर उच्च न्यायालयाने हा आदेश रहित करून तिला पुन्हा महंमद नक्श याच्याकडे पाठवण्याचा आदेश दिला.
१. न्यायालयाने म्हटले की, या मुलीने स्वच्छेने धर्मांतर केले आहे आणि महंमद याच्याशी विवाह केला आहे. यामुळेच तिने चांगली पत्नी बनून तिला मुसलमान बनवणार्या पतीसमवेत रहायला हवे.
२. या मुलीचे अपहरण झाले, तेव्हा ती अल्पवयीन होती, या पुराव्यांकडे न्यायालयाने दुर्लक्ष केले. न्यायालयाने हा निर्णय दिल्यावर न्यायालयात उपस्थित असणारी मुलगी रडत होती.
३. पाकिस्तानमध्ये प्रतिवर्षी अनुमाने १ सहस्र मुलींचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांच्या इच्छेविरुद्ध मुसलमान तरुणांशी विवाह लावून दिला जातो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात