राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या मुलींनाही देण्यात आला लसीचा डोस !
मॉस्को (रशिया) : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोरोना विषाणूविरोधी लसीला मान्यता दिली आहे. यामुळे लसीला मान्यता देणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. ‘माझ्या २ मुलींनाही याच लसीचा डोस देण्यात आला आहे’, असे पुतिन यांनी सांगितले. रशियाच्या ‘गामालिया इन्स्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी’ आणि ‘मायक्रोबायोलॉजी’ यांनी ही लस विकसित केली आहे. २ मासांपेक्षा अल्प कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता पडताळण्यासाठी अंतिम टप्प्याच्या वैद्यकीय चाचण्या चालू रहाणार आहेत. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मासापासून या लसीचे उत्पादन करण्याचा रशियाचा मानस आहे, तसेच ही लस सरकारकडून विनामूल्य देण्यात येणार आहे.
पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली लस निर्मितीविषयी एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत पुतिन म्हणाले होते की, ‘कोरोनावर आपण जी लस बनवू, त्याविषयी आपल्याला पूर्ण निश्चिती असली पाहिजे, तसेच काळजीपूर्वक आणि संतुलन राखून आपल्याला लसीची निर्मिती करायची आहे.
(सौजन्य: India Today)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात