बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक !
चितगाव (बांगलादेश) : ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने कोतवाली पोलिसांच्या साहाय्याने चितगाव महानगरमधील गरीब अल्पवयीन हिंदु मुलीची धर्मांधांच्या कह्यातून सुटका केली. २४ जुलै २०२० या दिवशी डोलन दास यांची १४ वर्षीय मुलगी प्रीती दास हिचे महंमद शकीब याने तिच्या घरून धर्मांतर करण्याच्या उद्देशाने अपहरण केले होते.
१. डोलन दास हे गरीब रिक्शाचालक आहेत. त्यांनी बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या मार्गदर्शनाखाली आरोपीविरुद्ध कटोवली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर ७ ऑगस्ट या दिवशी प्रीती हिची सुटका केली आणि दुसर्या दिवशी न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयात बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या अधिवक्त्यांच्या उपस्थितीत कलम २२२ अंतर्गत मुलीचे निवेदन घेतले.
२. न्यायालयाने अल्पवयीन मुलीला वडिलांच्या कह्यात दिले. मुलीची त्वरित सुटका केल्यामुळे बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी पोलिसांचे आभार मानले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात