संभाजीनगर (औरंगाबाद) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील दारु कंपन्यांना दिले जाणारे पाणी तात्काळ बंद करा, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शनिवारी शिवसेनेच्यावतीने संभाजीनगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दुष्काळी परिस्थितीत दारुऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
पाणी ही निर्माण करता येणारी गोष्ट नसल्यामुळे शक्य तिथे पाणी वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे दारू उत्पादक कंपन्यांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा, असे उद्धव यांनी सांगितले. सरकारला दारूतून मिळणाऱ्या महसुलाची चिंता पडली असेल तर महसूल इतर गोष्टींतून मिळवता येऊ, शकेल असे उद्धव यांनी सांगितले.
संदर्भ : लोकसत्ता