भाग्यनगर (तेलंगाणा) : आता काशी येथील विश्वनाथ मंदिर आणि मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिर यांनाही त्यांचे पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचे आहे. देशाला आत्मनिर्भर बनवायचे असेल, तर गुलामीची चिन्हे काढून टाकावी लागतील. या पवित्र कार्यामध्ये हिंदूंनी वैध मार्गाने अविरत संघर्ष करण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी केले. अयोध्येतील श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या संदर्भात ‘न्यूज १८’ या तेलुगु वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा श्री. चेतन गाडी यांनी वरील आवाहन केले. या वेळी श्री. गाडी यांनी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या संदर्भातील संघर्ष गाथेची माहिती सांगितली. त्यात मोगलांचे आक्रमण, मंदिरांचा विध्वंस, गेल्या ५०० वर्षांहून अधिक काळ हिंदूंनी केलेला संघर्ष, कारसेवकांचे बलीदान आदी माहिती विशद केली.
श्री. गाडी यांनी श्रीराममंदिराविषयी समितीने केलेल्या कार्याची आणि रामराज्याच्या म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी समिती कसे कार्य करत आहे, याचीही माहिती दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात