नेहमीप्रमाणे धर्मांधांनी त्यांच्या धार्मिक श्रद्धास्थानांचा कथित अवमान झाल्यावर दंगल केली. या वेळी ही दंगल बेंगळुरू येथे घडली. यात ६० हून अधिक पोलीस घायाळ झाले. यात एका अतिरिक्त पोलीस आयुक्तांचाही समावेश आहे. ३०० हून अधिक गाड्या जाळण्यात आल्या, २ पोलीस ठाण्यांची तोडफोड करण्यात आली. या वेळी पोलिसांनी स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात ३ धर्मांध ठार झाले. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने शेवटी का होईना पोलिसांनी गोळीबार करून दंगल रोखली. ‘गोळीबार केल्याविना धर्मांधांच्या दंगली रोखता येत नाहीत’, हे लक्षात घेऊन यापुढे देशात कुठेही धर्मांधांकडून दंगल करण्याचा प्रयत्न केला, तर लाठीमार, अश्रूधूर आदींचा वापर करण्याऐवजी थेट गोळीबाराचा आदेश देण्याचाच कायदा केला पाहिजे, अशी राष्ट्र्रप्रेमी नागरिकांनी मागणी केली पाहिजे.
कर्नाटकमध्ये काँग्रेस किंवा साम्यवादी, एम्.आय.एम्., समाजवादी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांचे सरकार असते, तर अनेक हिंदूंची हत्या झाल्यानंतर, पोलिसांच्या हत्या झाल्यानंतर कदाचित् ती रोखली गेली असती, असे पूर्वानुभवावरून कुणालाही वाटू शकते. आताही या राजकीय पक्षांनी कुठेही धर्मांधांनी केलेल्या इतक्या हिंसाचारानंतरही त्यांच्यावर टीका केलेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. नेहमी भाजपवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर अल्पसंख्यांकांवर कथित अत्याचार करण्यावरून टीका करणार्या मायावती, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, राहुल गांधी, असदुद्दीन ओवैसी आदींनी बेंगळुरूच्या घटनेवर अशा प्रकारे मौन धारण केले आहे, जशी या देशात अशी काही घटनाच घडलेली नाही. जावेद अख्तर, स्वरा भास्कर, शबाना आझमी, जितेंद्र आव्हाड, प्रशांत भूषण, अरुंधती रॉय, राजदीप सरदेसाई, रवीश कुमार, कन्हैया कुमार आदी तथाकथित निधर्मीवादी कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत, याचा शोध घेण्यासाठी एक विशेष अन्वेषण पथकच स्थापन करावे, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये. बेंगळुरूच्या या दंगलीनंतर या ढोंग्यांचे बिंग जन्महिंदूंसमोर फुटले आहे. जन्महिंदूंना सातत्याने धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे हे सर्व राजकीय पक्ष आणि व्यक्ती किती ढोंगी आहेत, हे आता जन्महिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. कारण या लोकांच्या मौनावरून असेच त्यांना म्हणायचे आहे की, ‘बेंगळुरूची दंगल ही धर्मनिरपेक्ष दंगल होती. त्यात कोणत्याही धर्माचा सहभाग नव्हता.’ हे लोक धर्मांधांना कधीही धर्मनिरपेक्षेतेचे डोस पाजत नाहीत आणि धर्मांधही ते कधीही घेत नाहीत. ते त्यांच्या धर्मात सांगितल्याप्रमाणे वागतात, त्यांचे कायदेही स्वतंत्र आहेत. जन्महिंदू धर्मानुसार वागण्याऐवजी राज्यघटनेनुसार वागतात. त्यामुळे ते नेहमीच धर्मांधांकडून मार खातात आणि त्याकडे ‘धर्मांधांकडून मार खाणे हीच खरी धर्मनिरपेक्षता आहे’, असा समज करून जगातात. यामुळे ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांनी कुठेही मागणी केली नाही की, ‘दंगलखोरांना कठोर शिक्षा करा, त्यांच्यावर कारवाई करा.’
ढोंगी काँग्रेसवाले आणि पुरोगामी !
ही दंगल काँग्रेसचे मागासवर्गीय आमदार श्रीनिवास मूर्ती यांचा भाचा नवीन याने फेसबूकवर महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून घडली. ‘नवीन भाजपचा कार्यकर्ता आहे’, असे विरोधी पक्षांकडून सांगण्यात येत आहे; मात्र तो काँग्रेस आमदाराचा भाचा आहे, हे तर सत्य आहे. मग काँग्रेस त्यांच्यावरील अशा आक्रमणाविषयी का बोलत नाही ? मूर्ती यांच्या घरावर २ सहस्रांहून अधिक असलेल्या धर्मांधांच्या जमावाने आक्रमण केले. त्यांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ केली. एरव्ही मागासवर्गियांवर आक्रमण झाल्यावर आरडाओरड करणारे काँग्रेसवाले आणि पुरोगामी यांनीही यावर मौन बाळगले आहे. यातून त्यांचे मागासवर्गियांविषयीचे प्रेम किती ढोंगी आहे, हे पुन्हा स्पष्ट होत आहे. धर्मांधांसाठी काँग्रेस स्वतःच्या आमदाराचाही बळी देण्यास सिद्ध आहेत, असेच यातून लक्षात येते. इतकेच नव्हे, तर मूर्ती यांनीही याविषयी तक्रार न करण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्ती यांचा भाचा यात अडकलेला आहे. यामुळेच त्यांनी असा निर्णय घेतला असेल, असेही वाटते. म्हणजे धर्मांधांना खुली सूट देण्याचाच हा प्रयत्न आहे. दुसरीकडे जे ‘मागासवर्गीय-मुसलमान भाई भाई’ म्हणतात, त्या पुरो(अधो)गाम्यांनीही मूर्ती यांच्या घरावरील आक्रमणावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. जेव्हा धर्मांध हिंदूंवर आक्रमण करतात, तेव्हा ते मागासवर्गीय किंवा ब्राह्मण असा भेद कधीच करत नाहीत. ते केवळ प्रत्येकाला ‘हिंदु’ म्हणूनच पहातात आणि त्याच्यावर आक्रमण करतात, हे या सर्वांच्या लक्षात कधी येणार ? असा प्रश्न उपस्थित होतो. केवळ राजकीय लाभासाठी आणि ब्राह्मण आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा द्वेष करण्यासाठीच अशा प्रकारचे ‘मागासवर्गीय-मुसलमान भाई भाई’ दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, असेही वाटते. त्यातच या दंगलीच्या वेळी धर्मांध श्री हनुमान मंदिराला लक्ष्य करणार होते, तेव्हा त्यांच्या धर्मबंधूंनी त्याचे रक्षण केले. या दंगलीवर मौन बाळगणारे आता याचे कौतुक करू लागतील आणि धर्मांधांचा बचाव करतील.
धर्मांधांवर वचक हवा !
‘ही दंगल पूर्वनियोजित होती’, असे कर्नाटकचे मंत्री सी.टी. रवि यांनी म्हटले आहे. ते सत्यही आहे. धर्मांधांकडून केली जाणारी प्रत्येक दंगल ही पूर्वनियोजित असते. मुळात धर्मांध नेहमीच दंगली करण्यासाठी सिद्धच असतात. त्यांच्याकडे अवैध शस्त्रे मोठ्या प्रमाणावर असतात. त्यांना दंगली करण्यासाठी केवळ कारणाची आवश्यकता असते. त्यात दुचाकीला धक्का लागला, होळीच्या वेळी रंग उडवला गेला, धर्मग्रंथातील पान फाडण्यात आल्याची अफवा उठली, म्यानमारमध्ये रोहिंग्यांवर अत्याचार झाले, अशा कारणांवरून ते काही क्षणात दंगल घडवतात. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांनाही दंगल रोखण्यासाठी ६० पोलीस घायाळ व्हावे लागले ३०० गाड्या जाळाव्या लागल्या, २ पोलीस ठाण्याची तोडफोड व्हावी लागली, हे परवडणारे नाही. धर्मांधांना दंगल करण्याचे धाडस होणार नाही, अशी स्थिती शासनकर्त्यांनी निर्माण केली पाहिजे. यातून समाज आणि देश यांचे रक्षण होणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात