- सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्याकडून अनेक देशविरोधी कारवाया करण्यात आलेल्या आहेत आणि त्या चालूही आहेत. असे असतांना त्यांच्यावर आतापर्यंत बंदी घातली गेली पाहिजे होती, असे जनतेला वाटते !
- तथाकथित भगव्या आतंकवादाच्या नावाखाली हिंदूंच्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, तृणमूल काँग्रेस, साम्यवादी हे राजकीय पक्ष अशा संघटनांवर बंदी घालण्याची मागणी कधीही करत नाहीत, हे लक्षात घ्या !
बेंगळुरू : येथील दंगलीच्या प्रकरणी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या ४ प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली आहे. या संघटनेचा संबंध अन्य गुन्हेगारी घटनांमध्येही असल्याचे पुरावे सापडले आहेत. अशा संघटनांवर बंदी घालण्यासाठी सरकार कठोर निर्णय घेईल. त्यासाठी आवश्यक पुरावे गोळ करून बंदी घातली जाईल, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री अश्वत नारायण यांनी सांगितले. या दंगलीच्या प्रकरणी बेंगळुरू महानगरपालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका इर्शाद बेगम यांचे पती कलीम पाशा याला अटक करण्यात आले आहे. या दंगलीच्या प्रकरणी अतापर्यंत ६० जणांना अटक करण्यात आली आहे, तर २०६ जणांना कह्यात घेण्यात आले आहे. या दंगलीच्या चौकशीसाठी ४ पथके बनवण्यात आली आहेत.
पोलिसांना ठार करण्याचा होता धर्मांधांचा उद्देश
पोलिसांनी या दंगलीच्या प्रकरणी ४ गुन्हे नोंदवले आहेत. त्यात म्हटले आहे की, ‘५ जणांच्या टोळीने २०० ते ३०० जणांच्या सशस्त्र जमावाचे नेतृत्व केले. त्यांचा उद्देश पोलिसांना ठार करण्याचा होता. ‘पोलिसांना सोडू नका, त्यांना पकडा ठार करा’, असे दंगलखोर म्हणत होते. पोलिसांवर आक्रमण करण्यासाठी त्यांनी गनिमी काव्याचा वापर केला.’ (एरव्ही धर्मांधांची बाजू घेऊन हिंदूंवर अत्याचार करणार्या पोलिसांना आतातरी जाग येईल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात