मुंबई : राष्ट्रध्वज हा भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहे. काही अपवाद वगळता तोे अन्य गोष्टींसाठी वापरणे गुन्हा आहे. तरीही विविध प्रकारे राष्ट्रध्वजाचे विडंबन होत असल्याचे दिसून येते. सध्या काही आस्थापनांनी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रध्वजाच्या रंगातील मास्क विक्रीसाठी ठेवले आहेत. जे पूर्णतः चुकीचे असून अशा प्रकारे होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. मीरा रोड पूर्व येथील आत्माराम नगर को.ऑ.हौ. सोसायटीच्या ध्वजारोहण कार्यक्रमात ते ऑनलाईन बोलत होते. सोसायटीचे रहिवासी प्रतिवर्षी उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा करतात. ज्येष्ठ रहिवासी श्री. प्रकाश जोशी यांच्या हस्ते या वेळी ध्वजारोहण झाले. श्री. नरेंद्र रेडकर यांनी हिंदु जनजागृती समितीचे आभार मानले.
हिंदु जनजागृती समिती राष्ट्र-धर्म जागृतीचे कार्य उत्तम प्रकारे करत आहे. यामुळे जनतेत अवश्य जागृती होईल. समितीला यासाठी आमच्याकडून शुभेच्छा !, असे सोसायटीचे सचिव श्री. सदानंद पुजारी यांनी सांगितले.