- इस्लामी देशांची संघटना, तसेच पाकिस्तान एरव्ही भारतात मुसलमानांवरील कथित अत्याचारांवर थयथयाट करत असतात; मात्र चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून चालू असलेल्या उघूर मुसलमानांवरील अत्याचारांविषयी ते साधा ‘ब्र’ही काढत नाही, हे लक्षात घ्या !
- हिंदूंच्याच रामजन्मभूमीवर अवैध असणारा बाबरीचा ढाचा पाडल्यावर ‘मातम’ करणारे, हिंसाचार करणारे भारतातील धर्मांध आता गप्प का ?
बीजिंग (चीन) : चीनच्या शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांच्या मशिदी पाडून तेथे शौचालय आणि मद्याची दुकाने उभारण्यात आल्याची माहिती ‘रेडियो फ्री एशिया’ने दिली. काही दिवसांपूर्वी गर्भवती उघूर मुसलमान महिलांचा बलपूर्वक गर्भपात करण्यात आल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. आतापर्यंत शिनजियांग प्रांतातील ७० टक्के मशिदी पाडण्यात आल्या आहेत.
१. शिनजियांग प्रांतातील आतुश येथील २ मशिदी पाडून तेथे सार्वजनिक शौचालय आणि मद्याचे दुकान उघडण्यात आले आहे. वर्ष २०१६ मध्ये या मशिदी पाडण्यात आल्या होत्या. इस्लामध्ये मद्याला हराम मानण्यात आले आहे.
२. मशिदींप्रमाणे वर्ष २०१६ पासून शिनजियांगमध्ये मुसलमानांची कब्रस्तानेही नष्ट केली जात आहेत. येथील मृतदेह, सांगाडे काढून ते नष्ट केले जात आहेत. आतापर्यंत येथील ४५ कब्रस्ताने नष्ट करून त्याजागी वाहनतळ बनवण्यात आले आहे, तर काही ठिकाणी ती जागा मोकळीच ठेवण्यात आली आहे.
३. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील ‘उघूर ह्यूमन राइट्स प्रोजेक्ट’ने चीनच्या या छळाविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात म्हटले होते की, ‘वर्ष २०१६ ते २०१९ या कालावधीत चीनमध्ये १० ते १५ सहस्र धार्मिकस्थळे पाडण्यात आली आहेत.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात