Menu Close

रोहिंग्यांना आतंकवादी बनवण्यासाठी पाकिस्तानकडून त्यांना म्यानमारमध्ये प्रशिक्षण

भारतविरोधी जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक, हेच या घटनेतून पुन्हा स्पष्ट होते !

नवी देहली : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. आता म्यानमारमध्येही आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत आहे, अशी माहिती समोर आली आहे. याद्वारे पाकला भारताच्या पूर्व सीमेवर आतंकवादी कारवाया करून भारताला याविरोधात व्यस्त करण्याचा पाकचा डाव आहे.

१. ब्रसेल्स येथील ‘दक्षिण आशिया डेमोक्रेटिक फोरम’चे संशोधक संचालक डॉ. सीगफ्राइड ओ वुल्फ यांनी सांगितले की, ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’ (जे.एम.बी.) या आतंकवादी संघटनेकडून ४० रोहिंग्याना आय.एस्.आय.आतंकवादाचे प्रशिक्षण कडून देण्यात येत आहे. ही संस्था भारत आणि अफगाणिस्तान येथे होणार्‍या आतंकवादी कारवायांप्रमाणे अन्य देशांतही आक्रमणे करून तेथे अस्थिरता निर्माण करू इच्छित आहे.

२. बांगलादेशचे सुरक्षा विशेषज्ञ अब्दुल राशिद यांनी सांगितले की, ‘गेल्या काही काळापासून कट्टरतावादी रोहिंग्यांनी येथे कारवाया करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र आम्ही त्यावर प्रतिबंध घातला. पाकिस्तान आतंकवादी संघटनांना साहाय्य करून भारताला अस्थिर करण्याचा पयत्न कत आहे, अशा वेळी बांगलादेश भारताला साहाय्य करत आला आहे. ज्यामुळे उत्तर-पूर्व भारतामध्ये होणारे कट उघळून लावले जातील.’

३. बांगलादेशाचे परराष्ट्रमंत्री शहरियार आलम यांच्या मते कट्टरतावाद पसरवण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्याला मोठे यश मिळाले नाही.

४.  म्यानमारच्या सैन्यधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार बांगलादेश आणि म्यानमार यांच्या सीमेवर सक्रीय असणार्‍या रोहिंग्यांची आतंकवादी संघटना ‘अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी’ने तिच्या कारवाया वाढवल्या आहे. पाक तिला सातत्याने साहाय्य करत आहे. या ‘आर्मी’चा प्रमुख पाकवंशी असून त्याचे सौदी अरेबियाशी संबंध आहेत. या संघटनेकडे आधुनिक शस्त्रे आहेत. या संघटनेला पाकमधील ‘तहरीक ए तालिबान (पाकिस्तान)’ या आतंकवादी संघटनेकडून प्रशिक्षण मिळाले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *