विरुधाचलम् (तमिळनाडू) येथील सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या श्री कोलांजियाप्पार मंदिरातील घटना
- मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ‘सरकारला केवळ मंदिरांतील पैशांशी देणेघेणे असल्यानेच ते मंदिरांतील अन्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे मंदिरात चुकीच्या गोष्टी घडतात’, असे कुणाला वाटल्यात चुकीचे काय ?
- मंदिराचे व्यवस्थान नीट होत नसल्याचे कारण पुढे करून सरकार मंदिरे कह्यात घेते; पण नंतर त्याच सरकारी नियंत्रणाखालील मंदिरांत जर अधार्मिक, असात्त्विक आणि चुकीच्या गोष्टी घडत असतील, तर मंदिरे भक्तांच्याच कह्यात असली पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
- हिंदु धर्माचे खरे वैरी हिंदूच ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते मंदिरांत व्यसन करून मंदिराचे पावित्र्य नष्ट करत आहेत. अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांमध्ये कधी असे प्रकार झाल्याचे ऐकले आहे का ? यासाठी आता हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवणे आवश्यक आहे !
चेन्नई : विरुधाचलम् येथील श्री कोलांजियाप्पार मंदिराच्या परिसरात २ युवक मांस आणि मद्य यांचे सेवन करत असल्याचा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला आहे. पुलावर शिवराजन् आणि शिवकुमार अशी त्यांची नावे असून ते या मंदिराचाच कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. शिवकुमार हा या मंदिराचा रखवालदार आहे. या मंदिरावर तामिळनाडू राज्य सरकारच्या ‘हिंदू रिलिजस अँड चॅरिटेबल एन्डाऊमेंट’ या विभागाचे नियंत्रण आहे.
दळणवळण बंदीमुळे सध्या या मंदिरात भाविकांना जाण्याची अनुमती नाही. केवळ पुजारी आणि काही कर्मचारी यांनाच मंदिरात जाण्याची अनुमती आहे. हे दोघे जण येथील नधवनम् बागेत मांस आणि मद्य यांचे सेवन करत होते. मंदिरातील अन्य दोन कर्मचार्यांची याचे चित्रीकरण करून हा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. या घटनेची माहिती मिळताच मंदिराचे कार्यकारी अधिकारी मरिमुथ यांनी मांस आणि मद्य सेवन करणार्या दोघा कर्मचार्यांना निलंबित करून या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात