Menu Close

बहरीनमधील सुपरमार्केटमध्ये बुरखाधारी धर्मांध महिलेने खाली फेकल्या श्री गणेशाच्या मूर्ती !

बहरीन सरकारच्या आदेशाने पोलिसांकडून गुन्हा नोंद

  • महंमद पैगंबर यांचा कथित अवमान झाल्यावरून धर्मांधांनी दंगल केली आणि कोट्यवधी रुपयांची हानी केली; मात्र हिंदूंच्या देवतांचा असा ढळढळीत अवमान झाल्यावरही हिंदूंच शांत आहेत. यावरून ते किती सहिष्णु आहेत, हे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, तसेच साम्यवादी, काँग्रेस, समाजवादी आदी राजकीय पक्ष हे लक्षात घेतील, अशी अपेक्षा करता येणार नाही !
  • धर्मांध महिलेच्या या कृत्यामुळे १०० कोटी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याविषयी केंद्रातील भाजप सरकारने तात्काळ बहरीन सरकारकडे अधिकृत निषेध नोंदवून त्यास समज देणे अपेक्षित होते !

बहरीन (मनामा) : येथील जुफेरमधील एक ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या ‘व्हिडिओ’मध्ये एका ‘सुपर मार्केट’मध्येे एका बुरखा घातलेली धर्मांध महिला ‘इस्लामी देशामध्ये गणपतीच्या मूर्ती का विकल्या जात आहेत ?’, असा प्रश्‍न विचारत श्री गणेशाच्या मूर्ती मांडणीतून खाली फेकतांना दिसत आहे. ही घटना समोर आल्यानंतर बहरीनच्या पोलिसांनी या ५४ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. बहरीनमधील अंतर्गत सुरक्षेसंदर्भातील मंत्रालयाने ट्वीट करून ही माहिती दिली. या महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बहरीनमध्ये जवळजवळ ४ लाख भारतीय रहातात. वर्ष २०१० मधील जनगणनेनुसार येथील ९.८ टक्के लोकसंख्या ही हिंदू आहे.

बहरीनच्या राजाचे माजी सल्लागार खलीद-अल खलीफा यांनी ‘या महिलेची कृती योग्य नव्हती. धार्मिक प्रतीकांची हानी करणे, हे बहरीनमधील लोकांच्या स्वभावात नाही. हा द्वेष पसरवणारा गुन्हा आहे. येथे सर्व धर्माचे आणि स्तरातील लोक एकत्र रहातात’, असे म्हटले आहे.

बहरीन मुसलमान देश असल्याचे अशा मूर्तींची पूजा कोण करते ते बघू ! – महिलेची धमकी

‘हिंदु राष्ट्रांत अन्य धर्मियांचे काय होणार ?’, असा प्रश्‍न विचारणारे ‘इस्लामी देशांत हिंदूंचे काय होत आहे ?’, याविषयी कधीच तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

या मूर्ती येथे विक्रीला ठेवण्यात आल्या होत्या. मूर्ती खाली फेकतांनाची घटना येथे अन्य एका महिलेने भ्रमणभाषवर चित्रित केली. या वेळी ही महिला अरबी भाषेत म्हणत होती की, ‘हा महंमद बीन इसाचा देश आहे. ते हे मान्य करतील, असे तुम्हाला वाटते का ?, हा मुस्लीम देश आहे. बरोबर ना ?, आता या मूर्तीची पूजा कोण करत बघू, करा पोलिसांना दूरभाष’, असे म्हणत या महिलेने मूर्ती खाली ढकलून दिल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *