पुणे : हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने १० एप्रिल या दिवशी कोथरूड येथे रामनवमीच्या दिवशी हिंदूंना अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये पूजा करण्याची विशेष अनुमती मिळावी, यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते.
या वेळी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच कर्नाटक अर्थसंकल्पामध्ये अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद रहित करावी, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. १२ एप्रिल या दिवशी निवासी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी श्री. राजेंद्र मुठे यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या वेळी समितीचे सर्वश्री बाळकृष्ण तागडे, कृष्णा पाटील, विनायक बागवडे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात