Menu Close

अभिनेत्री कंगना राणौत यांनी अभिनेता आमीर खान यांना सुनावले

स्वतःच्या मुलांनी मुसलमान धर्मानुसार आचरण करण्याची ईच्छा प्रदर्शित करणे, हीच तुझी धर्मनिरपेक्षता आहे का ?

तथाकथित कलाकारांच्या धर्मनिरपेक्षतावादाचा बुरखा फाडणार्‍या अभिनेत्री कंगना राणौत यांचे अभिनंदन !

 मुंबई – अभिनेते आमीर खान यांनी एका जुन्या मुलाखतीत ‘माझ्या मुलांनी मुसलमान धर्म आचरावा, हे मी नेहमी स्पष्टपणे सांगितले आहे’, असे सांगितले होते. त्यावर अभिनेत्री कंगना राणौत यांनी ‘हीच तुझी धर्मनिरपेक्षता आहे का’, असे आमीर खान यांना ट्वीटद्वारे सुनावले आहे.

तुर्कस्थानचे अध्यक्ष उघडपणे पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीरवरून होत असणार्‍या वादात पाकिस्तानची बाजू घेत आहेत. असे असतांना आमीर खान यांनी या अध्यक्षांच्या पत्नीची भेट घेतल्यामुळे भारतातील अनेक राष्ट्रप्रेमींनी आमीर खान यांना फटकारले आहे. त्या अनुषंगाने अभिनेत्री कंगना राणौत यांनी वरील विधान केले.

एका जुन्या मुलाखतीत आमीर खान यांनी मुसलमान धर्माविषयी विधान करतांना म्हटले होते, ‘हिंदुत्वाकडे माझा कल असला, तरी माझ्या मुलांना मी इस्लामनुसार आचरण करण्याचा सल्ला देतो. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही आपापल्या पद्धतीने जगतो. आम्ही दोघेही एकमेकांवर आमचे धर्म थोपवत नाही; मात्र माझ्या मुलांनी मुसलमान धर्म आचरावा, हे मी नेहमी स्पष्टपणे सांगितले आहे.’’

कंगना राणौत यांनी या मुलाखतीवरूनच ट्वीट करत म्हटले, ‘‘हिंदु + मुसलमान = मुसलमान. हा तर कट्टरतावाद आहे. हिंदु आईची (आमीर खान यांची पत्नी हिंदु आहे.) मुले ज्यांच्या नसांमध्ये श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे रक्त वहाते, ज्यांना सनातन धर्म आणि भारतीय संस्कृती यांचा वारसा लाभला आहे, त्या हिंदु आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांनी केवळ अन् केवळ इस्लाम धर्मानुसार आचरण का करावे ? असे का?’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *