विक्रीला नागरिक आणि अधिवक्ते यांचा विरोध
पुरी (ओडिशा) : येथील प्रशासनाकडून बागला धर्मशाळेच्या भूमीवरील ६ प्लॉट्सची विक्री ५ ते १२ ऑगस्ट २०२० या कालावधीत करण्यात आली. प्रशासनाने श्रीजगन्नाथ मंदिराच्या आजूबाजूची भूमी सुशोभीकरणासाठी कह्यात घेतली होती. त्यात भूमीहीन झालेल्या हॉटेलचालकांना हे ६ प्लॉट्स देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयास पुरीतील नागरिक आणि अधिवक्ते यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. दान केलेल्या भूमीची अशा प्रकारे विक्री करता येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
बागला धर्मशाळा वर्ष १९०५ मध्ये कोलकाताचे शेठ कन्हैयालाल बागला यांनी पुरीमध्ये मोठ्या संख्येने येणार्या भाविकांच्या सोयीसाठी ३ एकर जागेत बांधली होती. कालांतराने ती प्रशासनाच्या कह्यात गेली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात