Menu Close

रायचुरू : भगवान श्रीरामाविषयी फेसबूकवर अवमानकारक ‘पोस्ट’ करणार्‍या जहीर याला अटक

अटकेसाठी हिंदु धर्मप्रेमींचे पोलीस ठाण्याबाहेर शांततेत निदर्शने !

बेंगळुरू येथे धर्मांधांनी ज्या प्रकारे पूर्वनियोजन करून दंगल घडवली आणि हानी केली, ते पहाता हिंदूंनी वैध मार्गाने निदर्शने करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली. हिंदूंना असहिष्णु म्हणणारे आणि पुरस्कार वापसी करणारे, हे लक्षात घेणार नाहीत. उलट ते धर्मांधांच्या हिंसाचारावर मौनच बाळगतात, हे लक्षात येते !

रायचुरू (कर्नाटक) : फेसबूकवर भगवान श्रीरामाविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी येथील पोलिसांनी जहीर याला अटक केली आहे. या पोस्टमुळे देवदुर्ग गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. या आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात हिंदु धर्मप्रेमींनी पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने एकत्र येत शांततेच्या मार्गाने निदर्शने केली. ‘आरोपीला अटक केल्यावर आणि त्याच्यावर एफ्.आय.आर्. नोंदवल्याचे पाहिल्यावरच आम्ही परत जाऊ’, असा पवित्रा धर्मप्रेमींनी घेतला होता. या धर्मप्रेमींमध्ये श्रीराम सेनेचे कार्यकर्तेही सहभागी होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *