Menu Close

रामनवमीच्या निमित्ताने बेळगाव, चेन्नई आणि कर्णावती येथे आयोजित कार्यक्रमांना हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीनिमित्त बेळगाव येथे आयोजित केलेल्या शोभायात्रेत ४ सहस्रांहून अधिक हिंदू सहभागी !

belgaon_ramnavami2

बेळगाव (कर्नाटक) : शहरात रामनवमीच्या निमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन असणार्‍या या शोभायात्रेत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शोभायात्रेला बेळगावचे उपमहापौर श्री. संजय पाटील आणि नगरसेवक श्री. विजय भोसले हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच भाजपचे सर्वश्री किरण जाधव, अनिल बेनके, बजरंग दलाचे सर्वश्री विजय जाधव, हेमंत हावळ, श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. रमाकांत कोंडुस्कर आणि हरीष शानभाग उपस्थित होते. शोभायात्रेसाठी बेळगावातील होलसेल भाजी मार्केट युनियनच्या व्यापार्‍यांनी श्रीरामाची भव्य मूर्ती अर्पण केली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनवमीच्या उत्सवात भाविकांना मार्गदर्शन !

कर्णावती (अहमदाबाद) : येथील खोकरा परीसरातील श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. वैभव आफळे यांनी साक्षात् श्रीरामाचे तत्त्व अवतरित होणार्‍या या दिवशी आपण कोणत्या धार्मिक कृती कराव्यात ?, तसेच सध्याच्या काळात आदर्श रामराज्य येण्यासाठी धर्माचरण करण्याचे महत्त्व काय आहे ? आदी सूत्रांविषयी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. याचा १५० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामाचे विडंबन रोखले !

रामनवमी निमित्ताने मंदिरात महिला हॅपी बर्थ डे श्रीराम हे भजन म्हणत असतांना तेथे उपस्थित हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी या महिलांचे प्रबोधन केले आणि त्यांना धर्मशास्त्र सांगितले.

क्षणचित्रे

या उत्सवामध्ये सनातन निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचा परिसरातील ५०० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला.

विहिंपने आयोजित सत्संगात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

चेन्नई (तमिळनाडू) : येथील कोलाथुर भागात रामनवमीच्या मंगल दिनी विश्‍व हिंदु परिषदेने एका सत्संगाचे आयोजन केले होते. यात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून रामकृष्ण स्वामीजी सत्यज्ञानानंदजी उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित २०० जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना स्वामीजींनी श्रीरामाची दैवी गुणवैशिष्ट्ये सांगितली. विश्‍व हिंदु परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी राममंदिर बांधण्याचे महत्त्व सांगून पुण्यभू भारतात जन्माला येण्याचे आणि हिंदु धर्मात जन्म घेतल्याचे महत्त्व विशद केले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी श्रीराम मंदिराच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या समष्टी स्तरावरील भावपूर्ण प्रार्थनेचे महत्त्व सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, भ्रष्टाचार आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण यांमुळे आजचे राज्यकर्ते धर्माचरण करत नाहीत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी नामजप, साधना आणि आचारधर्माचे महत्त्वही त्यांनी विशद केले.

क्षणचित्रे

कार्यक्रमाच्या मुख्य अतिथींपैकी एक असलेले भारत माता वीर सावरकर शाळेचे श्री. मोहन आणि शाळेच्या मुख्याध्यापिका आणि श्री. मोहन यांच्या पत्नी सौ. विष्णुप्रिया यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *