जळगाव : १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामापासून वर्ष १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत क्रांतीकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत लढा दिला. मंगल पांडे, चापेकर बंधू, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांसारख्या असंख्य पुरुष क्रांतीकारकांसमवेत राणी लक्ष्मीबाई, प्रीतीलता वड्डेदार यांसारख्या महिला क्रांतीकारकही या लढ्यात सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक क्रांतीकारकाकडून आपल्याला शिकायला मिळते. त्यांनी जीवनात केलेला त्याग अन् देशभक्ती आपण आत्मसात करूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. येथे १८ ऑगस्टला तिथीनुसार झालेल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित गाथा शौर्याची : व्यर्थ न हो बलिदान या ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी पाळधी, खर्ची बु., डोंगर कठोरा, सांगवी बु., भुसावळ, यावल, एरंडोल, पाचोरा, जळगाव येथील युवक आणि युवती ऑनलाईन जोडले होते.
१. या वेळी सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करण्याचा निश्चय केला.
२. व्याख्यानात हिंदु जनजागृती समितीनिर्मित क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन ऑनलाईन दाखवण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात