Menu Close

श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सूड उगवण्यासाठी पाककडून हिंदुत्वनिष्ठांची हत्या करण्याचा कट

केंद्र आणि राज्य सरकारांनी हिंदुत्वनिष्ठांना संरक्षण द्यावे, अशीच हिंदूंची मागणी आहे !

नवी देहली : गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सूड उगवण्यासाठी पाकिस्तानने भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या करण्याचा कट रचला आहे. यासाठी पाकिस्तान भारतामध्ये रहाणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी संबंधित गुंडांचा वापर करण्याचा प्रयत्नात आहे. त्यात कुख्यात गुंड आणि आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम टोळीचा समावेश आहे. यामुळे देशातील ३ राज्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

भाजप, विश्‍व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला आहे. याच पार्श्‍वभूमीवर गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी गृहमंत्री गोरधन जडफिया यांच्या हत्येचा कट उधळून लावत इरफान शेख उपाख्य कालिया या २४ वर्षीय गुंडाला अटक केली आहे. त्याच्या अटकेच्या कारवाईच्या वेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला; मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. इरफान मुंबईतील चेंबूर येथे रहणारा आहे. तो दाऊद टोळीचा गुंड आहे. यापूर्वी गुजरातमध्ये गोध्रानंतरच्या दंगलीचा सूड उगवण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री हरेन पांड्या यांची हत्या करण्यात आली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *