विदेशांत हिंदु संस्कृतीचे वाढत चाललेले महत्त्व !
पॅरीस (फ्रान्स) : कोरोनामुळे सामाजिक अंतर राखण्यात येत असून त्याचे पालन सामान्य माणसापासून ते देशांच्या प्रमुखांपर्यंत केले जात आहे. याच अनुषंगाने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांचे हस्तांदोलन करण्याऐवजी हात जोडून नमस्कार करून स्वागत केले.
मर्केल सध्या फ्रान्सच्या भेटीवर आहेत. त्यांनी दक्षिण फ्रान्समध्ये फोर्ट डी ब्रेगाकानॉन येथे असणार्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानला भेट दिली. त्या वेळी त्यांच्या स्वागताच्या वेळी मॅक्रॉन यांनी मर्केल गाडीमधून उतरताच दोन्ही हात जोडून ‘नमस्ते’ म्हणत त्यांचे स्वागत केले. मॅक्रॉन यांनीच ट्विटरवरून हा १२ सेकंदांचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात