पाकमधील हाफीज सईद, मसूद अजहर आदी आतंकवाद्यांची संपत्ती जप्त करण्यामध्ये दाऊदचेही नाव
पाकने आता मान्य केले, तरी तो दाऊदला भारताच्या कह्यात देईल, याची शक्यता शून्यच आहे. आता जर दाऊदचा पत्ता समजला आहे, तर भारताने तेथे अमेरिका आणि इस्रायल हे देश जसे करतात, तसा सर्जिकल स्ट्राईक करावा, असेच जनतेला वाटते !
इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकिस्तानने त्याच्या देशातील ८८ बंदी घातलेल्या आतंकवादी संघटना आणि त्याचे प्रमुख आतंकवादी यांची बँक खाती अन् त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला आहे. या आतंकवाद्यांमध्ये मसूद अझहर, हाफीज सईद यांच्यासह दाऊद इब्राहिम याचाही समावेश आहे. दाऊदच्या कराचीमधील व्हाईट हाऊस या घराचा पत्ताही यात देण्यात आला आहे. यातून हे स्पष्ट झाले आहे की, दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच रहात आहे. आतापर्यंत पाकने ‘दाऊद त्याच्या देशात रहात नाही’, असे खोटेच सांगत होता.
आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणार्यांवर लक्ष ठेवणार्या ‘फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ (‘एफ्.ए.टी.एफ्.’ने) पाकला ‘ग्रे’ सूचीमध्ये टाकले आहे. त्यातून त्याला बाहेर येण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करणे आवश्यक झाल्याने त्याने हा आदेश दिला आहे. आतंकवादी संघटनांमध्ये जमात-उद-दावा, जैश-ए-महंमद, तालिबान, दाएश, हक्कानी समूह, अल् कायदा आणि अन्य संघटनांचा समावेश आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात