स्वतःच्या मुलांपेक्षा वयाने लहान असणार्या पीडित हिंदु मुलीशी विवाहित मुसलमानाचा निकाह
पाकमधील पीडित हिंदूंसाठी केंद्र सरकारने आता तरी आवाज उठवावा, अशी समस्त हिंदूंची अपेक्षा आहे !
भारतात अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांच्या प्रकरणी आरडाओरड करणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांविषयी गप्प का बसतो ?
इस्लामाबाद : पाकच्या सिंध प्रांतातील आणखी एका हिंदु मुलीचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करून तिचा तिच्याहून वयाने पुष्कळ मोठ्या असलेल्या अब्दुल्लाह नावाच्या मुसलमान व्यक्तीशी निकाह लावून दिल्याचा प्रकार घडला. इतकेच नव्हे, तर या घटनेची तक्रार करण्यासाठी गेलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांविरुद्धच मीरपूर सत्र न्यायालयात गुन्हा नोंद करण्यात आला. अब्दुल्लाह हा विवाहित असून त्याच्या मुलांपेक्षाही पीडित हिंदु मुलगी वयाने लहान आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात