- वैध मार्गाने विरोध करून धर्महानी रोखणार्या सर्व हिंदूंचे अभिनंदन !
असा विरोध जनतेला का करावा लागतो ? पोलीस आणि प्रशासन यांचे अशा अयोग्य - गोष्टींकडे लक्ष नसते का ? अशा गोष्टींमुळे उद्या कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्यानंतर पोलीस आणि प्रशासन जागे होणार आहेत का ?
मुंबई : ऑनलाईन साहित्य विक्री करणार्या ‘फ्लिपकार्ट’ या आस्थापनाने श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर एका बँकेविषयी सवलत देणारे विज्ञापन प्रसारित केले होते. या विज्ञापनामध्ये भगवान श्री गणेशाला सोंडेमध्ये भ्रमणभाष पकडल्याचे दाखवण्यात आले होते.
याविषयी धर्मप्रेमींनी हिंदु जनजागृती समितीला कळवल्यावर समितीकडून यास वैध मार्गाने विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला धर्मप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने यास वैध मार्गाने प्रचंड विरोध करण्यात आला. याचा परिणाम म्हणजे ‘फ्लिपकार्ट’कडून या विज्ञापनातून भगवान श्री गणेशाचे चित्र हटवण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात