हिंदूंच्या पवित्र धार्मिक ठिकाणी अशा प्रकारचे क्षेपणास्त्र तळ उभारून चीन तेथील पावित्र्य भंग करण्याचाच प्रयत्न करत आहे. यास भारत सरकारने चीनकडे विरोध करत निषेध नोंदवला पाहिजे !
नवी देहली : तिबेटमधील कैलास मानससरोवर परिसरात चीनकडून भूमीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्रांचा तळ उभारण्याचे काम चालू आहे. उपग्रहांद्वारे काढण्यात आलेल्या छायाचित्रांच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. चीनची येथे ‘एच्.क्यू.-९ सॅम’ क्षेपणास्त्रप्रणाली तैनात करण्याची योजना आहे. क्षेपणास्त्र प्रणालीसमवेतच वाहनआधारित रडार यंत्रणाही सज्ज असणार आहे. ‘एच्.क्यू.-९ सॅम’ क्षेपणास्त्र प्रणाली ‘एच्.टी.-२३३’ रडारवर अवलंबून असते. याखेरीज ‘टाइप ३०५ बी’, ‘टाइप १२०’, ‘टाइप ३०५ए’, ‘वाय.एल्.सी.-२०’ आणि ‘डी.डब्ल्यु.एल्.-००२’ हे रडारही असतील. हे रडार्स लक्ष्याला शोधून ते नष्ट करण्याच्या क्षमतेचे आहेत.
छायाचित्र : इंडिया टुडे
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात