हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांच्या केलेल्या आंदोलनास यश
हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने केलेल्या विरोधामुळेच पोलिसांना बंदी घालण्याची कारवाई करावी लागली आहे. अशा प्रकारचा प्रयत्न धर्मांध कधीतरी करतात का ? ते थेट कायदा हातात घेऊन जनतेच्या आणि देशाच्या संपत्तीची हानी करतात आणि निधर्मीवादी त्यावर सोयीस्कर मौन बाळगतात !
गौहत्ती (आसाम) : आसाममध्ये ‘रेनगोनी’ या स्थानिक खासगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्या आसामी भाषेतील ‘बेगम जान’ या ‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण करणार्या मालिकेच्या प्रसारणावर पोलिसांनी बंदी घातली आहे.
समाजाविरोधात संघर्ष करावा लागणार्या एका हिंदु मुलीच्या प्रवासाची कथा या मालिकेत दाखवण्यात आली होती. त्यात हिंदु मुलीने एका मुसलमान मुलाशी पळून जाऊन विवाह केला होता, असे दाखवण्यात आले होते.
अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि संघटना यांनी या मालिकेवर बंदी घालण्यासाठी गौहत्तीच्या पोलीस आयुक्तांना पत्र दिले होते. त्यावर आयुक्तांनी दूरचित्रवाहिनीवरील प्रक्षेपित कार्यक्रमांची चाचणी करणार्या आणि ‘केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यां’तर्गत स्थापित झालेल्या जिल्हास्तरीय समितीकडे हे प्रकरण सोपवले होते. या समितीने ही मालिका आणि त्यातील काही अंश बघून ‘या मालिकेने सामाजिक दुरावा निर्माण होऊन जातीय तणाव वाढण्याची शक्यता आहे’, असा निष्कर्ष काढला, तसेच या मालिकेवर ६० दिवसांची बंदी घालण्याची शिफारस केली. त्यानुसार आयुक्तांनी ‘रेनगोनी’ या दूरचित्रवाहिनीला पत्र देऊन सदर मालिकेवर ६० दिवसांची बंदी घातली आहे. तसेच ‘ही बंदी कायम का ठेवू नये ?’ अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे.
(म्हणे) ‘मालिकेचा लव्ह जिहादशी संबंध नाही !’ – निर्माता आणि अभिनेत्री यांचा दावा
या मालिकेत नायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रीती कोकोंगाना आणि मालिकेचे निर्माते यांचे म्हणणे आहे की, ‘बेगम जान’ मालिकेचा ‘लव्ह जिहाद’शी काही संबंध नाही आणि खरी गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे.’ (असे प्रत्यक्षात नाहीत, हेच पोलिसांच्या बंदीतून स्पष्ट झाले आहे. – संपादक,दैनिक सनातन प्रभात )
हिन्दुओं के संगठित विरोध के बाद असम सरकार ने लव जिहाद को बढावा देनेवाले बेगम जान धारावाहिक पर लगाया प्रतिबन्ध
https://www.hindujagruti.org/hindi/news/155738.html या लिंकवर सविस्तर वाचा.
हिंदु जनजागृती समितीने मालिकेवर बंदी घालण्यासाठी राबवली होती ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम !
हिंदु जनजागृती समितीने या मालिकेचे प्रसारण थांबवण्यासाठी ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम राबवली होती. या मालिकेच्या अधिकृत कथेस विरोध करत सामाजिक माध्यमांचा वापर करणार्या अनेकांनी आरोप केला होता की, ‘यात एका हिंदु मुलीने एका मुसलमान मुलाशी पळून जाऊन विवाह केल्याचे दाखवले आहे. ज्यालाच ‘लव्ह जिहाद’ म्हटले जाते.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात