अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भरचौकात त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्यात यावी, अशी कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
जलपाईगुडी (बंगाल) : जलपाईगुडी जिल्ह्यात एका १६ वर्षाच्या आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह घराच्या सेप्टिक टाकीमध्ये टाकण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी रहमान अली, जमीरुल हक आणि तमिरुल हक यांना अटक केली आहे.
न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. स्थानिक तृणमूल काँग्रेसचे आमदार खगेश्वर रॉय यांनी मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. रॉय यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. (तृणमूल काँग्रेसच्या सत्ताकाळात बंगालमध्ये धर्मांधांना गुन्हेगारी आणि राष्ट्रघाती कारवाया करण्यासाठी मोकळे रान मिळालेले आहे. त्यावर आधी कारवाई करण्याची मागणी रॉय यांनी त्यांच्या सरकारकडे केली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात