ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ‘जिनियस इंटरनॅशनल पब्लिक स्कूल’मधील विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’, या विषयावर नुकतेच ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. अर्चना गणोरकर यांनी विविध माध्यमांतून होणार्या राष्ट्रध्वजाच्या अपमानाविषयी सविस्तर प्रबोधन केले, तसेच सण, उत्सव आणि थोर राष्ट्रपुरुष यांच्याविषयी माहिती दिली. या ‘ऑनलाईन’ मार्गदर्शनाचा ७ वी आणि ८ वीचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक असे एकूण मिळून ६३ जणांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्यालयाच्या शिक्षिका सौ. अपर्णा संत यांनी साहाय्य केले. मुख्याध्यापिका सौ. शालिनी पांडे यांनी समिती आणि वक्ते यांचा परिचय करून दिला. विद्यालयाच्या व्यवस्थापिका सौ. रक्षणा घाडगे यांनी, ‘यापुढेही असे कार्यक्रम करायला आवडेल’, असे सांगितले.
क्षणचित्रे
१. ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’, या विषयावर ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.
२. विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक विषय समजून घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात