Menu Close

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी धर्मांध हीर खान हिला अटक

हिंदूंच्या धार्मिक श्रद्धास्थानांचा अवमान धर्मांधांनी केल्यावर हिंदू वैध मार्गाने विरोध करतात, तर अल्पसंख्यांकांच्या धार्मिक श्रद्धास्थानांचा कथित अवमान झाल्यावर ते कायदा हातात घेऊन जनता आणि देश यांच्या संपत्तीची हानी करतात !

नवी देहली : हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील विधाने करणार्‍या हीर खान या महिलेला प्रयागराज पोलिसांनी देहलीतून अटक केली. सामाजिक माध्यमांतून तिची देवतांविषयीची अश्‍लील विधाने प्रसारित झाल्यावर तिच्यावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली होती. ट्विटरवर तिला अटक करण्याचा हॅशटॅग (एकाच विषयावर ट्विटरवर घडवून आणलेली चर्चा) ट्रेंडही चालवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांकडून तिच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर ती पसार झाली होती. शेवटी तिला देहलीतून अटक करण्यात आली.

हीर खान हिने यू ट्यूब चॅनल ‘ब्लॅक डे ५ ऑगस्ट’वरून व्हिडिओ प्रसारित केला होता. यात तिने माता सीतेवर अश्‍लील विधाने केली होती. तसेच अयोध्येविषयीही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *