Menu Close

चीन आणि पाकिस्तान जैविक अस्त्रे बनवत आहेत ! – ऑस्ट्रेलियातील संकेतस्थळाचा दावा

  • चीन आणि पाकिस्तान जैविक अस्त्रे बनवत असतील, तर त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी भारतानेही औषधे बनवायला हवीत आणि त्यासाठी आतापासून प्रयत्न केले पाहिजेत !
  • ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाला जी माहिती मिळाली, ती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे का ? मिळाली असेल, तर त्याविषयी सरकारने काही उपाययोजना काढली आहे का, याची माहिती जनतेला मिळणे आवश्यक !

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) : ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी – चीन-पाक आर्थिक महामार्ग) याच्या आडून चीन आणि पाकिस्तान जैविक अस्त्रे बनवत आहेत. गेल्या ५ वर्षांपासून यावर काम चालू आहे, असा दावा ऑस्ट्रेलियातील संकेतस्थळ ‘क्लाक्सोन’ने केला आहे. विशेष म्हणजे ज्या प्रयोगशाळेवर कोरोनाची निर्मिती केल्याचा आरोप आहे, त्या वुहानमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ला याचे दायित्व देण्यात आले आहे, असेही यात म्हटले आहे.

१. या संकेतस्थळावरील अँथनी क्लान यांच्या अहवालानुसार वुहानचे वैज्ञानिक पाकिस्तानात वर्ष २०१५ पासून जैविक अस्त्राच्या निर्मितीवर संशोधन करत आहेत.

२. ‘क्लाक्सोन’ संकेतस्थळाने दावा केला आहे की, गेल्या मासात चीन आणि पाक यांनी जैविक अस्त्रांची क्षमता वाढवण्यासाठी ३ वर्षांचा आणखी एक गोपनीय करार केला आहे. दोन्ही देशांच्या वैज्ञानिकांनी केलेले संशोधन नियतकालिकामध्ये छापून आले आहे.

३. हे संशोधन डिसेंबर २०१७ ते मार्च २०२० पर्यंत केलेले आहे. जनावरांपासून माणसाला लागण होणार्‍या विषाणूंची ओळख आणि लक्षणे यांवर हे संशोधन आधारित आहे.

४. या संशोधनात नील व्हायरस, मर्स-कोरोना व्हायरस, क्रीमिया-कॉन्गो हेमोरजिक फीवर व्हायरस, थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम व्हायरस आणि चिकनगुनिया यांवर प्रयोग केले गेले आहेत. यासाठी सहस्रो पाकिस्तानी पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. सध्या या विषाणूंपासून वाचण्यासाठी कोणतेही रामबाण औषध नाही. या विषाणूंपैकी काही जगातील घातक आणि संक्रमक विषाणू आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *