Menu Close

अभिनेता सुशांत यांच्या हत्येच्या चौकशीत चित्रपटसृष्टीतील अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे उघड होण्याची शक्यता

अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाच्या गोवा येथे धाडी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या हत्येच्या अन्वेषणामध्ये सुशांत यांची प्रेयसी रिया चक्रवर्ती यांचे अमली पदार्थ तस्करांशी ‘व्हॉट्सॲप’ संदेशाद्वारे झालेले संभाषण उघड झाले आहे. या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंध पथकाद्वारे रिया चक्रवर्ती यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून याचा शोध घेण्यासाठी पथकाने गोवा येथे धाडी टाकल्या आहेत.

अमली पदार्थांचा तस्कर गौरव आर्य हा अभिनेत्यांना अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे अन्वेषणात आढळून आले आहे. अमली पदार्थ प्रतिबंध पथकाचे संचालक राकेश अस्थाना यांनी सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांना अमली पदार्थाचा पुरवठा होत असल्याचे यापूर्वी घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आता गौरव आर्य याचा शोध घेत आहेत. यातून चित्रपटसृष्टीतील अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *