Menu Close

वास्को येथील प्रसिद्ध श्री दामोदर सप्ताहानंतर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटू लागली : नागरिकांची श्रद्धा

‘श्रद्धावान भक्ताचे ईश्‍वर रक्षण करतोच’, याची ही प्रचीती आहे !

वास्को : मुरगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता घटू लागली आहे. विशेष म्हणजे वास्को येथे नुकताच संपन्न झालेल्या श्री दामोदर सप्ताहानंतर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटू लागल्याचे अनेकांना वाटत आहे.

मुरगाव तालुक्यात वास्को शहरी आरोग्य केंद्र आणि कुठ्ठाळी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तालुक्यात अनेक ‘प्रतिबंधात्मक क्षेत्रे’ (कंटेन्मेंट झोन) आहेत आणि दैनंदिन ‘मेडिकल बुलेटीन’मध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक असायचा. सप्ताहापूर्वी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा दैनंदिन ‘मेडिकल बुलेटीन’मधील आकडा ८०० झाला होता; मात्र नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘मेडिकल बुलेटीन’मध्ये हा आकडा ३०० पर्यंत खाली आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असल्याने मांगोर हिल आणि खारीवाडा हे भाग ‘प्रतिबंधात्मक क्षेत्रा’तून हटवण्यात आले आहेत, तर बायणा आणि सडा हे भाग ‘लघु प्रतिबंधात्मक क्षेत्रा’तून (मायक्रो कंटेन्मेंट झोन) हटवण्यात आले आहेत. चिखली उपजिल्हा रुग्णालयातील अधिकार्‍यानेही वास्को शहर आणि मुरगाव तालुका यांमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आल्याच्या अन् रुग्णांची सख्या उणावत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे.

स्थानिक नागरिक अनंत प्रभु म्हणाले, ‘‘प्रसिद्ध श्री दामोदर सप्ताहानंतर एक मासाने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने घटत आहे.’’ स्थानिक नागरिक अनिता पै म्हणाल्या, ‘‘गोव्यातील एक मोठी झोपडपट्टी असलेल्या झुवारीनगर झोपडपट्टीतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने उणावत आहे. या ठिकाणी आता सुमारे २० कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यंदा श्री दामोदर सप्ताहाच्या निमित्ताने जांबावली येथील श्री दामोदर देवस्थानातून विशेष ‘कौल प्रसाद’ आणून तो वास्को येथील श्री दामोदर मंदिरात ठेवण्यात आला होता. या कौलप्रसादाचे परिणाम आता दिसू लागले आहेत.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *