आतंकवादी आक्रमणाची शक्यता
‘आतंकवाद्यांना धर्म असतो’ म्हणून ते हिंदूंना आणि त्यांच्या नेत्यांना लक्ष्य करतात ! भारतात कधीही अन्य धर्मियांच्या नेत्यांवर आतंकवादी आक्रमणाचे संकट येत नाही, हे लक्षात घ्या !
भाग्यनगर (तेलंगाणा) : येथील गोशा महल मतदारसंघातील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्यावर आतंकवादी आक्रमण होण्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
भाग्यनगर पोलीस आयुक्त अंजनीकुमार यांनी याविषयीचे एक पत्र टी. राजा सिंह यांना पाठवले आहे. यात म्हटले आहे की, तुम्ही कधी कधी प्रवासासाठी दुचाकीचा वापर करता; मात्र सुरक्षेसाठी तुम्ही दुचाकी चालवू नये, तसेच सुरक्षेविना कुठेही जाऊ नये. तुम्ही दुचाकी चालवण्याऐवजी तुम्हाला सरकारकडून देण्यात आलेल्या ‘बुलेट प्रूफ’ चारचाकी गाडीचा वापर करावा. ही गाडी सरकारने तुमच्या सुरक्षेसाठीच दिलेली आहे. तुम्हाला देण्यात आलेले सुरक्षारक्षक विशेष प्रशिक्षित आहेत, तसेच तुमच्या सुरक्षेची सातत्याने समीक्षाही केली जाईल.
श्रीराममंदिराच्या भूमीपूजनामुळे हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करण्याचे पाकचे षड्यंत्र
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सूड उगवण्यासाठी पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय.ने भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेते, तसेच भाजप आणि रा.स्व. संघ यांचे नेते, यांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र रचले आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी काही आतंकवाद्यांना केलेल्या अटकेतून ही माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर टी. राजा सिंह यांना लक्ष्य करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
कोणत्या आतंकवादी संघटनांकडून धोका आहे ते सांगावे ! – टी. राजा सिंह
या पत्राविषयी आणि संभाव्य आक्रमणाविषयी टी. राजा सिंह म्हणाले की, भाग्यनगरच्या पोलीस आयुक्तांनी ‘माझ्या जीवाला धोका असल्याने मी दुचाकीवरून जाणे टाळावे’, असे सांगितले आहे. मी पोलीस आयुक्तांना विचारतो की, मला नेमका काय धोका आहे ? कोणती आतंकवादी संघटना, स्थानिक संस्था किंवा एखादी व्यक्ती माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे ?, ते सांगावे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, गृहमंत्री महंमद महमूद अली आणि पोलीस आयुक्त अंजनीकुमार यांच्याकडे ‘मला असणार्या धोक्याचे स्वरूप काय आहे ?’ याची विचारपूस केली जाईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात